Tuesday, July 9, 2024

Death Anniversary | ‘महल’च्या यशाने कमाल अमरोहींना बनवले स्टार, तर ‘पाकीजा’ बनवून त्यांनी रचला इतिहास

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शकांनी आपल्या काळात अनेक नवीन चित्रपट आणून यशस्वी करून दाखवले होते. याच यादीत नाव घेतले जाते, ते म्हणजे कमाल अमरोही (Kamal Amrohi) यांचे. कमाल अमरोही हे हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांच्या अनेक चित्रपटांची आजही चर्चा होत असते. शुक्रवारी (११ फेब्रुवारी) कमाल अमरोही यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने पाहूया त्यांनी दिग्दर्शित केलेले काही दर्जेदार चित्रपट.

कमाल अमरोही हे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांना त्या काळात परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत चित्रपट लिहिले, गाणी लिहिली आणि स्वतः त्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. इतके ते आपल्या कामात पारंगत होते. आज पाहुया त्यांच्या काही अजरामर कलाकृती.

पाकिजा
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपट म्हणून या चित्रपटाचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. नुकतीच ‘पाकिजा’ चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट तयार करायला कमाल यांना तब्बल १४ वर्षे लागली होती. या चित्रपटाची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ कलाकृतींमध्ये केली जाते. चित्रपटात मीना कुमारी (Mina Kumari) यांनी अभिनय केला होता.

महल
हिंदी चित्रपट जगतातील पहिला भयपट म्हणून ‘महल’ या चित्रपटाचे नाव घेतले जाते. या चित्रपटाने कमाल अमरोही यांना रातोरात स्टार केले होते. त्यांच्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले होते. हा चित्रपट १९४९मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अभिनेत्री मधुबाला (Madhubala) आणि अशोक कुमार (Ashok Kumar) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

रझिया सुल्तान
कमाल अमरोही यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रभाव पाडू शकला नाही. मात्र कमाल यांच्या सुंदर दिग्दर्शनाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांनी काम केले होते. हा चित्रपट तयार व्हायला ८ वर्षे लागली होती.

दायरा
कमाल अमरोही यांनी दिग्दर्शित केलेला आणखी एक दर्जेदार चित्रपट. हा चित्रपट १९९३मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात मीना कुमारी आणि नासिर खान (Nasir Khan) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट त्या काळातील सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून ओळखला गेला होता.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा