Wednesday, July 3, 2024

बिकिनीमुळे अभिनेत्री अमला पॉल आली होती ट्रोलर्सच्या निशाण्यावर; आता तिच्याच अंदाजात दिले सडेतोड प्रत्युत्तर

दक्षिण भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले होते, ज्यात ती बिकिनीमध्ये दिसत होती. या फोटोंंमुळे तिला अनेक प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे. फोटोंमुळे सतत ट्रोल झाल्यानंतर अमलाने यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

अमलाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या सुट्टीचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. मात्र, जेव्हा चाहत्यांनी अमलाचे हे बोल्ड फोटो पाहिले, तेव्हा त्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर आता अमलानेही ट्रोलर्सला जबरदस्त फटकारले आहे.

तिच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये अमलाने कपड्यांबद्दल ट्रोल करणाऱ्या प्रतिक्रियेला उत्तर देताना लिहिले की, “एक स्त्री तिच्या इच्छेनुसार आणि तिच्या आवडीनुसार कपडे घालते. मुलीच्या ड्रेसिंग सेन्सचा न्याय करण्याचा कोणालाही अधिकार नाही.” अमलाच्या उत्तरातून हे स्पष्ट झाले आहे की, ती कोण काय म्हणेल याकडे लक्ष देत नाही. एक स्त्री समजते की, तिच्या आयुष्यात तिला हवे ते करण्याची तिच्यात क्षमता आहे. महिलांना लोकांच्या सल्ल्याची गरज नाही. सोशल मीडियावर महिलांना लक्ष्य करणे बंद केले पाहिजे. असे अभिनेत्रीचे स्पष्ट मत यातून समजते.

अनेक नेटकरी अमलाच्या उत्तराचे कौतुक करत आहेत. त्यांनी तिला ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही दिला आहे. अमला सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, पण कधीकधी तिला अशा गोष्टींनाही सामोरे जावे लागते. अलीकडच्या काळात अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत ऑनलाईन ट्रोलिंगची तक्रार केली आहे. अनेक अभिनेत्रींनी यावर जबरदस्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

अमला पॉल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्येही चर्चेत राहिली आहे. दिग्दर्शक एएल विजय यांच्याशी तिचे नाव जोडले गेले होते. २०११ मध्ये अमलाने एएल विजयसोबत ‘देवा थिरुमगल’ चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. जरी, दोघांनी सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांचे नातेसंबंध नाकारले, परंतु नंतर २०१६ मध्ये अमलाने चाहत्यांना तिच्या आणि एएल विजयशी असलेल्या नात्याबद्दल माहिती दिली होती.

अमला पॉलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अभिनेत्री लवकरच तेलुगू वेब सीरिज ‘कुडी येदामैथे’मध्ये दिसणार आहे. मात्र, ती आजकाल सुट्टीचा आनंद घेत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काजोलसोबतच्या अफेअरच्या अफवांवर शाहरुखने दिले होते उत्तर; म्हणाला होता, ‘मी काजोलबरोबरही तिच्या घरी…’

-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण

-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद

हे देखील वाचा