Friday, August 1, 2025
Home साऊथ सिनेमा ‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या अभिनयाने मोठा चाहतावर्ग कमावतात. यशाच्या पायऱ्या चढत एक दिवस ते मोठे स्टार बनतात. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर कोटींच्या घरात मानधन देखील घेतात. त्यांच्या अभिनयाने चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरगोस कमाई करतात. अशात अनेक नवीन कलाकार देखील सिनेसृष्टीत पदार्पण करत असतात. यातील काही कलाकारांचे अभिनय इतके दमदार असतात की, त्यांना दमदार अभिनयाच्या जोरावर मोठ मोठ्या स्टार्सबरोबर काम करण्याची संधी मिळते. तसेच त्यांचे अभिनय मोठ्या कलाकारांच्या अभिनयापेक्षाही वरच्या दर्जाचे ठरतात. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे जिम सरभ.

रणवीर सिंगचा ‘पद्मावत’ चित्रपट, तर तुम्ही सर्वांनी पहिलाच असेलच. या चित्रपटामध्ये रणवीरने साकारलेली अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका चाहत्यांनी चांगलीच डोक्यावर घेतली. या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून कमजोर काळजाची माणसे देखील नक्कीच घाबरली असतील. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर सहाय्यक भूमिका (मलिक काफूरची) निभावलेलया जिम सरभलाही कोणी विसरू शकत नाही. त्याने आपल्या अभिनयाने अनेक सीनमध्ये रणवीरलाही मागे टाकले होते. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी जाणून घेऊयात. (Amazing facts about birthday boy and Bollywood actor Jim sarbh)

जिम सरभ शुक्रवारी (२७ ऑगस्ट) आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतो. त्याचा जन्म साल १९८७ मध्ये मुंबईमधील एका पारशी कुटुंबात झाला होता. त्याची आई निवृत्त फिजिओथेरपिस्ट आहे, तर वडील माजी मास्टर मरिनर आहेत. जिम तीन वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबीयांसह तो ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाला. त्यांनतर वयाच्या आठव्या वर्षी तो पुन्हा भारतात परतला. जिमने त्याचे प्राथमिक शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्याने अमेरिका गाठली. तेथील एमोरी युनिव्हर्सिटीमध्ये त्याने मानसशास्त्राची पदवी संपादन केली.

मानसशास्त्राची पदवी तर घेतली, परंतु त्याचा करिअरसाठीचा कल अभिनयाकडेच जास्त होता. त्यामुळे नंतर त्याने अटलांटामध्ये थिएटरचे शिक्षण घेतले. तेथे त्याला एक वर्ष साहित्य इंटर्न म्हणून काम मिळाले. या काळात त्याने ‘द शो’, ‘ब्रेकअप’, नाबलसमधील ‘टेनिस’ आणि अटलांटामधील ‘आइस ग्लेन’ अशा नाटकांमध्ये काम केले. त्याच्या तेथील शेवटच्या दमदार भूमिकेमुळे त्याला मेट्रोपॉलिटन अटलांटा थिएटर पुरस्कार मिळाला. त्यांनतर जिम पुन्हा एकदा 2012 मध्ये भारतात परतला. त्यांनतर त्याने पुन्हा नाटकांमधील आपले काम सुरु ठेवले. साल २०१६ मध्ये राम माधवानी यांच्या ‘नीरजा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये जिमने एका भयावह आतंकवाद्याची भूमिका निभावली होती. या चित्रपटांनंतर तो ‘पद्मावत’मध्ये झळकला. त्यातील मलिक काफूरच्या भूमिकेने तो चांगलाच चर्चेत होता.

असा मिळाला ‘पद्मावत’ चित्रपट
जिमचा दमदार अभिनय रणवीरने ‘नीरजा’ चित्रपटात पहिलाच होता. एका वेगळ्याच अंदाजातील त्याची हिंदी भाषा रणवीरला आवडली होती. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणवीर म्हणाला होता की, “जिमला ‘नीरजा’ चित्रपटामध्ये पाहूनच मला समजले होते की, हा मुलगा दमदार अभिनयाने काहीतरी करू शकतो. ‘पद्मावत’ मधील मलिक काफूरच्या भूमिकेसाठी हा उत्तम आहे. त्यामुळे मी संजय भन्साळींना त्याचे नाव सुचवले.”

त्याचबरोबर जिम ‘राबता’, ‘संजू’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकला. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळवणाऱ्या जिमने अनेक वेबसीरिजमध्येही काम केले आहे. त्याने ‘स्मोक’, ‘मेड इन हेवन’ आणि ‘फ्लिप’सारख्या मालिका केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुरुष कलाकारांना जास्त फी मिळण्यावर बोलल्या नीना गुप्ता; म्हणाल्या, ‘पुरुषांच्या या जगात स्त्रियांना…’

-‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

हे देखील वाचा