Tuesday, July 9, 2024

आंबेडकर जयंती: जातीय व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘या’ चित्रपटांनी दाखवले समाजातील भीषण सत्य

आज (१४ एप्रिल) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिणे किंवा सांगणे अशक्य आहे. महान समाजसुधारक, न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि तत्त्वज्ञ असे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचे वर्णन करता येईल. स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आयुष्यभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरूद्ध लढा दिला. अर्थशास्त्रात उच्चविद्याविभूषित असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधने केली. त्यांचे भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. या खास दिनानिमित्त जाणून घेऊया जाती व्यवस्थेवर आधारित चित्रपटांबद्दल.

बॅन्डेट क्वीन :
या सिनेमातून एका दलित मुलीच्या जीवनावर भाष्य केले आहे. जिला सतत बलात्कार आणि मानसिक हल्ल्यांच्या सामना करावा लागतो. त्यानंतर ती हत्यार घेऊन डाकू बनते. हा सिनेमा भारतीय चित्रपटांपैकी एक उत्कृष्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात सीम बिस्वास यांनी फुलनदेवीची भूमिका साकारली असून, शेखर कपूर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आर्टिकल १५ :
अनुभव सिन्हा दिग्दर्शित हा सिनेमा पूर्णतः जातीय व्यवस्थेवर आधारित आहे. आयुष्यमान खुराणाने यात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून हा अधिकारी दोन दलित मुलीच्या हत्येचा तपस करतो. यादरम्यान त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हा सिनेमा तुफान हिट झाला होता.

आरक्षण :
सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा आरक्षण व्यवस्थेवर बनवला आहे. प्रकाश झा यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात सैफ अली खान, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, मनोज वाजपेयी आदी दिग्गज कलाकारांनी काम केले होते.

मांझी :
नवाझुद्दीन सिद्दीकी याच्या करिअरमधील एक उत्तम सिनेमा म्हणून मांझी सिनेमा ओळखला जातो. या सिनेमात त्याने त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. एका दलित माणसाच्या पत्नीला रोज डोंगर चढून प्रवास करावा लागायचा. यातच एक दिवस तिचा डोंगरावरून पाय घसरल्यामुळे पडून मृत्यू होतो. त्यानंतर मांझी स्वतः तो डोंगर पोखरून त्यातून रास्ता बनवतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा