Tuesday, July 9, 2024

जॉनी डेप-अंबर हर्ड प्रकरणात नवा ट्विस्ट, कोर्टाच्या निर्णयावर अभिनेत्रीने उठवले प्रश्न

जॉनी डेप आणि अभिनेत्री एम्बर हर्ड गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. दोघांमधील वाद संपण्याचे नाव घेत नाहीये. अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील न्यायालयात जॉनी डेपकडून पराभूत झालेल्या अंबरने मानहानीच्या खटल्यातील न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा केला आहे. बदनामीच्या निकालात नव्याने खटला चालवावा, अशी इच्छा असल्याने तिने न्यायालयात धाव घेतली आहे.

अंबर हर्डच्या कायदेशीर संघाने ज्युरी सदस्याच्या चुकीच्या पद्धतीने बसल्याचा आरोप करून जॉनी डेपचा समावेश असलेल्या मानहानीच्या खटल्याचा खोटा खटला घोषित करण्याचा प्रयत्न केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने असा युक्तिवाद केला आहे की ज्युरी सदस्य क्रमांक १५ ही व्यक्ती वास्तवात कोर्टाने बोलावलेली व्यक्ती नव्हती आणि या खटल्यात ते योग्यरित्या काम करू शकत नव्हते.

एम्बरच्या वकिलांनी यूएस कोर्टाला सांगितले की, हाय-प्रोफाइल खटल्यात चुकीच्या ज्युरी-सदस्याला बसवण्याच्या योग्य प्रक्रियेशी तडजोड केली गेली आहे. हे ज्युरी-सदस्य कर्तव्यासाठी सूचीबद्ध नव्हते, तरीही ते खटल्याचा भाग बनले आणि त्यामुळे न्यायालयाने १ जूनचा निकाल बाजूला ठेवून नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश द्यावेत. माध्यमातील वृत्तानुसार अंबरचे वकील आता आरोप करत आहेत की बदनामीच्या खटल्यात चुकीच्या ज्युरी-सदस्याला ठेवण्यात आले होते.

माध्यमातील वृत्तानुसार, ७७ वर्षीय व्यक्तीला ज्युरी ड्युटीसाठी बोलावण्यात आले होते, जो ५२ वर्षीय व्यक्तीच्या पत्त्यावर राहतो. या प्रकरणात असे दिसून येते की ज्युरी सदस्य क्रमांक 15 प्रत्यक्षात तीच व्यक्ती नव्हती जी ज्युरी पॅनेलवर सूचीबद्ध होती.

अंबरचे वकील एलेन ब्रेडहॉफ्ट यांनी या प्रकरणात सांगितले की, हा खोटा खटला घोषित करण्यात यावा. तसेच, नव्याने सुनावणीचे आदेश द्यावेत. यापूर्वी एम्बरच्या कायदेशीर टीमने म्हटले होते की, ‘हर्डच्या ऑप-एडमुळे डेपच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचा कोणताही पुरावा नाही.’

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पायल रोहतगी आणि संग्राम सिंग यांनी बांधली साता जन्माची गाठ, लग्नाचे फोटो आले समोर

सचिन पिळगावकरांची लेक ‘या’ वेबसीरिजमध्ये बनणार ‘सेक्स वर्कर’, भुवन बामही लावणार अभिनयाचा तडका

साठ रुपयापासून करिअरला सुरुवात केलेले अलोकनाथ ‘असे’ बनले संस्कारी बापू, वाचा

हे देखील वाचा