Monday, March 30, 2026
Home बॉलीवूड अमीशा पटेलने जुन्या आठवणीना दिला उजाळा, सलमान खानसोबत बर्थडे सेलिब्रेशनचा खास फोटो केला शेअर

अमीशा पटेलने जुन्या आठवणीना दिला उजाळा, सलमान खानसोबत बर्थडे सेलिब्रेशनचा खास फोटो केला शेअर

अमीशा पटेल ही एक बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आणि तिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. तर अनेक चित्रपटामध्ये उत्तम कामगिरी करुन प्रेक्षकांच्या मनात तिने स्थान निर्माण केले आहे. तसेच हि अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तर तिने सध्या एक जुना फोटो शेअर केला आहे. तो जुना फोटो म्हणजे सलमान खानसोबत लॉस एंजेलिसमध्ये साजरा केलेल्या तिच्या वाढदिवसाच्या अठवणीचा आहे. तिने हा फोटो नुकताच इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

या फोटोंमध्ये, अमीशा तिच्या खास वाढदिवसादिवशी केक कापताना दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये, सलमान आणि अमीशा एकमेकांच्या शेजारी उभे आहेत. अमीशा हसत आहे, तर सलमानच्या चेहऱ्यावर खोडकर भाव आहेत. तर या दुसऱ्या फोटोमध्ये, सलमान (salman)अमीशाच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसत आहे. या दोघांच्या आजूबाजूला इतर काही लोकही आहेत. तर तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे, “आमच्या वर्ल्ड टूर दरम्यान, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये साजरा केलेल्या माझ्या वाढदिवसाच्या थ्रोबॅक आठवणी असे म्हटले आहे.

अमीशा पटेलटच्या कामाबाबत पाहले तर अमीशाने 2000 साली हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या ब्लॉकबस्टर पदार्पणानंतर, तिने ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘हमराज’, ‘भूल भुलैया’ आणि ‘रेस 2’ यांसारख्या चित्रपटांमधून इंडस्ट्रीत आपले स्थान अधिक मजबूत केले. अमीशा शेवटची ‘गदर 2’ मध्ये दिसली होती, ज्यात तिने तिची लोकप्रिय भूमिका ‘सकीना’ पुन्हा साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रणवीर सिंग आणि संजय दत्त यांनी पार्टीमध्ये केला डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

हे देखील वाचा