अभिनेत्री अमीषा पटेल(Ameesha Patel) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. नुकतचं तिनं विवाहित असल्याचे सांगत चाहत्यांना धक्का दिला आहे. तिच्या या लग्नासंदर्भातील विधानानंतर अभिनेत्रिने कोणाशी लग्न गाठ बांधली आहे? कोणासोबत सात फेरे घेतले आहेत? असं अनेक सवाल चाहत्यांसह बी टाऊनमध्ये उपस्थित होत आहेत.
४८ वर्षीय अमीषा पटेलने (Ameesha Patel)एका मुलाखतीदरम्यान विवाहीत असल्याचा खुलासा केला. फिल्मीज्ञानसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना अभिनेत्री म्हणाली, खऱ्या आयुष्यात माझे भलेही लग्न झाले नसले तरी, माझे एका व्यक्तीवर खूप प्रेम आहे. मी या व्यक्तीला माझा पती म्हणून स्वीकारले आहे. मला हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ आवडतो. माझा त्याच्यात जीव अडकला आहे.मी त्याला माझा पती म्हणून मनापासून स्वीकारले आहे.
अमिषाच्या(Ameesha Patel) या वक्तव्यानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिच्या या वक्तव्यावर कमेंट्सचा वर्षावर करत आहेत. काही युजर्सनी अभिनेत्री दीपिका पदुकोणची कॉपी करु नकोस असा सल्ला दिला आहे. तर काही युजर्स तिला शुभेच्छा देत आहेत.
काही दिवसांपूर्वी दीपिकाने एका मुलाखतीत असेच काहिसे वक्तव्य केलं होतं. तिने आपल्या मनात विन डिझेलशी लग्न केल्याचे सांगितले होते.
अमिषा पटेलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिषा पटेल शेवटची ‘गदर 2’ चित्रपटात दिसली होती. अभिनेत्रिने आपल्या करिअरची सुरुवात ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून केली होती. यानंतर ‘गदर’ चित्रपटामुळं अमीषाच्या करिअरला चालना मिळाली. मात्र, आता ती चित्रपटांपेक्षा इव्हेंट्स आणि सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे.
Anil Kapoor Fitness: अनिल कपूर अजूनही का दिसतात तरुण ? सोनम कपूरने केला खुलासा
राहुल गांधींना बिग बींचे सडेतोड उत्तर?, ‘त्या’ विधानानंतर अमिताभ यांची पोस्ट चर्चेत