Wednesday, June 25, 2025
Home हॉलीवूड डोक्याला शॉट! गर्लफ्रेंड प्रेग्नंट, एक्स गर्लफ्रेंडही प्रेग्नंट, प्रसिद्ध अभिनेता दहाव्यांदा बनणार बापमाणूस

डोक्याला शॉट! गर्लफ्रेंड प्रेग्नंट, एक्स गर्लफ्रेंडही प्रेग्नंट, प्रसिद्ध अभिनेता दहाव्यांदा बनणार बापमाणूस

हॉलिवूडमधून एक अशी बातमी समोर येत आहे, जी ऐकून प्रत्येकजण विचारात पडू शकतो. अमेरिकन टीव्ही होस्ट, अभिनेता, रॅपर आणि कॉमेडियन अशा विविध भूमिका साकारणारा निक कॅनन याने जगभरातील सर्व व्यक्तींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण, निक हा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा नाही, तर तब्बल दहाव्यांदा बाप बनणार आहे. याबद्दल स्वत: निक याने सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे, निक कॅनन (Nick Cannon) हा त्याच्या पत्नीच्या मुलाचा नाही, तर एक्स गर्लफ्रेंड ब्रिटनी बेल हिच्या मुलाचा बाप बनणार आहे. चकित करणारी बाब अशी की, त्याची पत्नीदेखील प्रेग्नंट आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, निक याची गर्लफ्रेंड ऍबी डे ला रोजा (Abby De La Rosa) ही लवकरच आई बनणार आहे. तिच्या मुलाच्या जन्मानंतर निक नवव्यांदा बाप बनेल. त्यानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड एका मुलाला जन्म देईल आणि त्यासोबतच निक दहाव्यांदा बाप बनेल. निक याने ब्रिटनी बेल (Brittany Bell) हिच्यासोबतचा एक फोटो त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये ब्रिटनी तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तसेच, निक हा कॅमेऱ्यासमोर ब्रिटनीवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

व्हिडिओ केला शेअर
खरं तर, निक आणि ब्रिटनी आधीपासूनच तिच्या १९ महिन्यांची मुलगी पावरफुल क्वीन आणि ५ वर्षांचा मुलगा गोल्डन सॅगनचे आई-वडील आहेत. आता दोन अपत्यांनंतर ब्रिटनी पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे. ती निकच्या नवव्या मुलाला जन्म देणार आहे. हा व्हिडिओ शेअर करत निकने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वेळ थांबली आणि हे घडलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by NICK CANNON (@nickcannon)

चाहतेही हैराण
एका युजरने लिहिले की, “नसबंदी करून घे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “हे विचित्र आहे, आता थांब निक.” आणखी एकाने लिहिले की, “हा मुद्दाम असे करत आहे. ही मजेची गोष्ट नाहीये.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “काय चेष्टा लावलीये, त्याने आता थांबलं पाहिजे.”

इतर मॉडेल्सकडूनही आहेत मुलं
खरं तर, ब्रिटनीकडून झालेल्या दोन अपत्यांनंतर निकचे आणखी ६ मुले आहेत, जे वेगवेगळ्या मॉडेल्सकडून झाले आहे. एक्स पत्नी मारिया कॅरेकडून निकला दोन जुळी मुलं आहेत. दुसरीकडे, मॉडेल ब्री तीसी हिच्याकडून निकला एक मुलगा आहे. एबी दे ला रोजा हिच्याकडूनही निकला जुळी मुलं आहेत. ती पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे. ती आता तिसऱ्या बाळाला जन्म देईल. तसेच, गायिका अलिसा स्कॉट हिच्याकडून निकला एक मुलगा होता, जो पाच महिन्यांचा असताना २०२१मध्ये मेंदूच्या कर्करोगामुळे मरण पावला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by NICK CANNON (@nickcannon)

कधीकाळी राहायचे होते ब्रह्मचारी
सन २०२१च्या अखेरीस निक कॅनन याने सांगितले होते की, त्याला ब्रह्मचारी राहायचे आहे. यानंतर त्याने २०२२मध्ये घोषणा केली होती की, तो मॉडेल ब्रे टेसीच्या मुलाचा बाप बनणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कपूर खानदानाने सुरू केली रणबीर-आलियाच्या बाळाच्या स्वागताची तयारी? डिलीव्हरीसाठी करतायेत खास पूजा
बिपाशाच्या बेबी बंपजवळ जात पती करणने गायले गाणे; व्हिडिओ पाहून चाहताही म्हणाला, ‘नजर न लागो’
‘थोडंही वजन वाढलेल्या अभिनेत्रीला प्रेक्षक सहजासहजी स्वीकारत नाहीत,’ सुबोधच्या प्रश्नावर काय म्हणाली ऋता?

हे देखील वाचा