थलापती विजय हा लोकप्रिय अभिनेता आहे. तो नेहमी अनेक कारणामुळे चर्चेत आला आहे. मागील काही दिवसांमध्ये तो त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या पत्नीने घटस्फोट मागितला आहे. तर सध्या विजय हे एका रिसेप्शन पार्टीमध्ये दिसला. निर्मात्या कल्पना एस. सुरेश आणि मीनाक्षी सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हजर होता. 5 मार्च रोजी चेन्नई येथे हे रिसेप्शन झाले. तर या रिसेप्शन पार्टीला विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन एकत्र दिसले. यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर सोशल मीडियावर अफेअरच्या अफवांमध्ये, विजय आणि त्रिशा यांचा हा व्हायरल व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
विजय (vijay)आणि त्रिशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. व्हिडिओमध्ये, विजय फुलांचा गुच्छ घेऊन दिसला, तर अभिनेत्री त्रिशा त्याच्या मागे गाडीतून उतरताना दिसली. ते कल्पना सुरेश आणि मीनाक्षीच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित होते. कल्पना कुटुंब चित्रपट निर्मिती आणि वितरणात गुंतलेले आहे.
27 फेब्रुवारी रोजी संगीताचा घटस्फोटाचा अर्ज सोशल मीडियावर समोर आला, ज्यामध्ये तिने न्यायालयाला तिचे 27 वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणण्याची विनंती केली. चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात तिने घटस्फोट मागण्याची कारणे सविस्तरपणे सांगितली. संगीताने तिच्या याचिकेत विजयवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला.
विजय आणि त्रिशाने पहिल्यांदा गिल्लीमध्ये एकत्र काम केले, जे एक मोठे व्यावसायिक यश आणि कॉलीवूडमधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरले. नंतर त्यांनी थिरुपाची,आथी, आणि कुरुवी सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 15 वर्षांच्या अंतरानंतर, लोकेश कनागराज यांच्या दिग्दर्शित “लिओ” मध्ये ही जोडी पुन्हा एकत्र आली. दरम्यान, विजयचे चाहते आता “जाना नायकन” च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियंका चोप्राला मोठी जबाबदारी, रॉबर्ट डाउनी जुनियर सोबत शेअर करणार स्टेज










