Tuesday, March 24, 2026
Home बॉलीवूड छोट्या बजेटच्या चित्रपटापुढे फिकी पडली ‘धुरंधर 2’?, 4 दिवसांतच बजेटच्या 4 पट केली कमाई

छोट्या बजेटच्या चित्रपटापुढे फिकी पडली ‘धुरंधर 2’?, 4 दिवसांतच बजेटच्या 4 पट केली कमाई

भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट तयार होत असतात. तसेच छोट्या बजेटमध्ये असलेले चित्रपट हे सुद्धा तयार होऊन तितकेच ताकतीने चालतात. तर सध्या धुरंदर 2 बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. याच वादळात एक कमी बजेटचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर रणवीर सिंग अभिनीत धुरंदर 2 चित्रपट मोठ्या बजेटमध्ये तयार झालेला आहे. मात्र एक छोट्या बजेटचा चित्रपट या चित्रपटाला टक्कर देत असल्याचे दिसत आहे. तर चित्रपटाचे पहिले दोन भाग सुपरहिट ठरले होते.

आदित्य धर (dhar)दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2  देखील बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे. मात्र केरळच्या ‘आडू 3’ या कमी बजेटच्या चित्रपटाने हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. रणवीर सिंगच्या ‘धुरंधर2’बद्दल बाजारपेठ इतकी सावध होती की, यशच्या ‘टॉक्सिक’सारख्या एका मोठ्या दाक्षिणात्य चित्रपटानेही टक्कर टाळण्यासाठी आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.

‘आडू 3’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जगभरात 87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चित्रपटाचे यश अजून थांबलेले नाही. चित्रपटाने सोमवारची कसोटीही पार केली असून, अवघ्या चार दिवसांत त्याच्या एकूण व्यवसायाने 90 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. मात्र, ॲडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीवरून हे आधीच स्पष्ट झाले होते की, ‘आडू 3’ केरळमध्ये ‘धुरंधर 2’ ला कडवी टक्कर देईल. इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये ‘धुरंधर 2’ चे ॲडव्हान्स बुकिंग सर्वात कमी होते, म्हणूनच ‘आडू 3’ साठी प्रेक्षकांची क्रेझ दिसून आली. तर ‘आडू 3’ हा चित्रपट फक्त 20 कोटी रुपये मध्ये बनला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रजनीकांतनी ‘धुरंधर 2’चं केलं कौतुक, अन् आदित्य धरला म्हणले ‘बॉक्स ऑफिसचा बाप’

हे देखील वाचा