Wednesday, July 3, 2024

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानच्या मुलीचा बॉयफ्रेंडसोबतचा गोड व्हिडिओ व्हायरल, दोघेही दिसले रोमँटिक अंदाजात

सोशल मीडिया म्हणजे एक आभासी आणि अतिशय आगळेवेगळे मोठे जग आहे. या सोशल मीडियाच्या जगात रोज नवनवीन लोकं मीडिया सेन्सेशन बनत असतात. फक्त कलाकारच नाही, तर त्यांची मुलं, सामान्य लोकं देखील या सोशल मीडियामुळे खास बनतात.

याच सोशल मीडियाच्या जगातील सध्याचे सर्वात मोठे सेन्सेशन बनलेले नाव म्हणजे आयरा खान. बॉलfवूडच्या ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानची मुलगी असलेली आयरा सध्या सोशल मीडियामधील मोठे नाव झाले आहे. आयराने अजूनपर्यंत अभिनयात जरी पदार्पण केले नसले, तरीही तिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.

आयरा तिच्या व्यासायिक कामापेक्षा जास्त तिच्या लव्हलाईफमुळेच मोठ्या प्रमाणावर चर्चेत असते. आमिर खानची लेक म्हटल्यावर ती अभिनयात पदार्पण करणार असे अनेकांना वाटले होते. मात्र, तिच्या या पदार्पणाबाबत सध्या जरी साशंकता असली, तरीही तिने तिचे सोशल मीडियाच्या माध्यमातून तागडे फॅन फॉलोविंग तयार केले आहेत.

आयरा नेहमीच तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे वेगवेगळे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतच असते. असच एक व्हिडिओ तिने नुकताच पोस्ट केला आहे. आयराने तिचे आणि तिचा बॉयफ्रेंड असलेल्या नुपूर शिखरेचे अनेक फोटो एकत्र करून हा व्हिडिओ तयार केला आहे.

या दोघांच्या असंख्य आठवणींना एकाच व्हिडिओमध्ये आणण्याचा आयराचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने त्यांच्या सुट्ट्यांपासून, पार्टी, वर्कआउट, स्विमिंग, डिनर अशा अनेक फोटोंना स्थान दिले आहेत. आयराने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले, “तू माझा आधार आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

तिच्या या व्हिडिओला उत्तर देताना नुपूरने देखील “माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असे लिहिले आहे. यावर्षी व्हॅलेंटाईन डे ला आयराने तिचे आणि नुपूरचे नाते अधिकृतरीत्या जगासमोर आणले होते.

काही दिवसांपूर्वी आयराने तिचा एक व्हिडिओ पोस्ट करत तिचे योग्य नाव आणि त्याचा अर्थ देखील सर्वाना सांगितला होता. मीडियामध्ये आयराचे नाव नेहमीच इरा म्हणून घेतले जायचे. त्यामुळे आयराने तिचा एक व्हिडिओ पोस्ट करत तिचे नाव इरा नसून आयरा असल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा