Wednesday, June 26, 2024

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या कामामुळे, वैयक्तिक आयुष्यामुळे किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गंभीर दुखापत झाली आणि चितारपटाची शूटिंग थांबवण्यात आली. त्यांनी याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली होती. त्यानंतर सर्वांनाच त्यांच्या तब्येतीची चिंता होती. मात्र आता अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबद्दल एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आजारपणाच्या सुट्टीनंतर आता पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. याची माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावरून दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमधून याबद्दल माहिती देताना तब्येतीविषयी देखील सांगितले आहे. त्यांना झालेल्या जखमेनंतर आता ते बरे झाले असून, ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शुटिंगवर देखील परतले आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या मांसपेशींना ताण बसला आणि टिशू फाटले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांना काही दिवस अराम करण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी त्यांनी त्यांच्या फॅन्सला भेटणे देखील रद्द केले होते.

अमिताभ बच्चन यांनी ५ एप्रिल रोजी ब्लॉगमध्ये लिहिले, “कामाला निघालो…फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फेस..टचअप आणि शॉट…लेखन सुधार आणि त्यावर चर्चा…वर्कफ्रंटवरील मूड थोडा गंभीर असेल आणि ते दिसेल.’ अमिताभ यांनी यासोबत त्यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मागच्या महिन्यात अमिताभ बच्चन यांना ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाच्या दरम्यान गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या या ब्लॉगनंतर त्यांचे फॅन्स खुश झाले असून, त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. आणि त्यांना शुभेच्छा देण्यासोबतच काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गर्व, लाइफस्टाइलमध्ये पैसा…’ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून विवेक अग्निहोत्री यांनी साधला सुपरस्टार्सवर निशाणा

मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

हे देखील वाचा