Friday, July 5, 2024

वाढदिवसाच्या पोस्टमध्ये स्वतःचच वय चुकीचं सांगून बसले बिग बी! मग पुढं जे झालं…

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी या ग्लॅमरच्या दुनियेत आपलं वेगळं जग, म्हणजेच भला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. यामध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि शतकातील सुपरहिरो म्हटल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. भारदस्त आवाज आणि उंची यामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यावर्षी बिग बी आपला ७९ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

अलाहाबादमध्ये ११ ऑक्टोबर १९४२ रोजी, जन्मलेल्या बिग बींनी आपल्या कारकिर्दीत मोठे स्थान मिळवले आहे. त्यांच्या वयाचे बहुतेक नायक आता रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. अशामध्ये बिग बी केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे, तर टीव्ही जगतातही नाव कमावत आहेत. त्याच वेळी, ते सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात आणि चाहत्यांना आपल्याबद्दल अपडेट देत राहतात. (amitabh bachchan birthday the legend gets his own age wrong in his birthday post daughter shweta corrects him)

चुकीचं सांगितलं आपलं वय!
अमिताभ यांनी अलीकडेच त्यांच्या वाढदिवसासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आणि त्याला एक मजेदार कॅप्शनही दिले. मात्र त्यांनी यावेळी एक चूक केली जी, त्यांच्या मुलीने दुरुस्त केली. बिग बींनी लिहिले होते, “अस्सी की ओर चले.. जब साठा तब पाठा, जब अस्सी तब लस्सी, मुहावरे को समझना भी एक समझ है.” यासह त्यांनी अनेक हसणाऱ्या इमोजी पोस्ट केल्या होत्या. मात्र, त्यांची मुलगी श्वेता यांनी कमेंट सेक्शनमध्ये ही चूक दुरुस्त केली.

श्वेता बच्चन नंदाने अमिताभ यांना कमेंट सेक्शनमध्ये सांगितले की, या वर्षी त्यांचा ८० वा वाढदिवस नाही, तर ७९ वा वाढदिवस आहे. म्हणजे अमिताभ यांना वाटले असावे की, ते या वर्षी आपला ८० वा वाढदिवस साजरा करणार आहे.

Photo Courtesy: Instagram/amitabhbachchan

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले. त्यांनी लिहिले, ‘माझे हृदय या सर्व अभिनंदनांनी भरलेले आहे. म्हणूनच तुम्हाला कसं काय बोलू हे मला समजत नाहीये. तुम्हा सर्वांना एक एक करून धन्यवाद देणे सोपे नाही. परंतु मला माहित आहे की, तुम्ही मला समजून घ्याल आणि मला केवळ तुम्ही आणि आमचे हवे आहे. हे प्रेम माझ्यासाठी पुरेसे आहे.”

बिग बींना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांकडून शुभेच्छा मिळत आहेत. त्यांची नात नव्या नवेली नंदाने या पोस्टवर त्यांना हात जोडून नमस्कार केला, तर रणवीर सिंगने ‘डॉन’ अशी कमेंट केली. त्याचवेळी भूमी पेडणेकरने लिहिले, “स्वॅग…वाढदिवसाच्या शुभेच्छा सर.” यासह, चाहत्यांनी देखील त्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि या पोस्टला खूप प्रेम दिले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर आजकाल बिग बी ‘केबीसी १३’ होस्ट करत आहेत आणि प्रेक्षकांकडूनही या शोला खूप पसंती मिळत आहे. शिवाय, अमिताभ ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ आणि ‘मेडे’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. अमिताभ अखेरच्या वेळेस ‘चेहरे’ चित्रपटात दिसले होते. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शहनाझ गिलचा चेहरा पाहून चाहत्यांना जाणवली उदासीनता, व्हिडिओ पाहून करतायत विचारपूस

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा