Tuesday, February 24, 2026
Home बॉलीवूड अगस्त्य नंदाने उजळले अमिताभ बच्चनांचे नाव, ‘इक्कीस’च्या कमाईवर बिग बींकडून नातवाला खास शुभेच्छा

अगस्त्य नंदाने उजळले अमिताभ बच्चनांचे नाव, ‘इक्कीस’च्या कमाईवर बिग बींकडून नातवाला खास शुभेच्छा

नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अगस्त्य नंदाने सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. जरी हा त्याचा दुसरा चित्रपट असला, तरी थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे आजोबा अमिताभ बच्चनही नातवाला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांनी अलीकडेच ‘इक्कीस’चा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टसोबत त्यांनी चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यातील बॉक्स ऑफिस कलेक्शनही सांगितले आहे. ‘इक्कीस’ने पहिल्या आठवड्यात 22.05 कोटी रुपयांची कमाई केली असून, यावर बिग बी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे – “Yo… Agastya… way to go.” बिग बींचा हा पोस्ट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. करण जोहरच्या शो ‘फॅब्युलस लाइव्ह्स वर्सेस बॉलिवूड वाइव्स’ मधील शालिनी पासी यांनीही कमेंट करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं – “शानदार फिल्म.
एका यूजरने कमेंटमध्ये म्हटलं – “शेवटचे काही सीन पाहून डोळ्यात पाणी आलं. जयदीप अहलावत आणि धर्मेंद्रजींनी चित्रपट सावरला आहे. अगस्त्यही काही ठिकाणी चांगला वाटला.” तर दुसऱ्या यूजरने लिहिलं – “Miles to go, Agastya.”

‘इक्कीस’ने 1 जानेवारी 2026 रोजी 7.28 कोटींच्या ओपनिंगसह सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 4.02 कोटींची कमाई केली, तिसऱ्या दिवशी पुन्हा वाढ होत 5.05 कोटी मिळवले, तर चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 5.70 कोटींची कमाई झाली. अशा प्रकारे चार दिवसांत चित्रपटाने एकूण 22.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

या चित्रपटातून अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे, हा ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट आहे. अगस्त्य, सिमर आणि धर्मेंद्र यांच्यासह या चित्रपटात जयदीप अहलावत, सिकंदर खेर, विवान शाह आणि राहुल देव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
मंडे टेस्टमध्ये ‘इक्कीस’ अपयशी? अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या चित्रपटाचा पहा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

हे देखील वाचा