Monday, July 1, 2024

कोरोनाने केलेत बिग बिंचे हाल! पोस्ट शेअर करत मांडली व्यथा

मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) केवळ चित्रपटातच नाही तर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग त्‍याच्‍या चाहत्‍यांशीही जोडलेले राहतात आणि त्‍यांची दैनंदिन माहितीही शेअर करतात. नुकतीच अमिताभ बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती पुन्हा समोर आली होती, त्यानंतर त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे त्यांना दिवस काढणे कठीण झाले आहे. आता बिग बींनी असेही सांगितले आहे की, आजकाल ते स्वतः त्यांचे बाथरूम साफ करत आहेत आणि बेड देखील स्वतःच ठीक करतात.

या पोस्टमध्ये बिग बींनी लिहिले, “आणि अचानक तुम्हाला कोविड 19 मुळे तुमचे बाथरूम स्वतः स्वच्छ करावे लागतो. बेड स्वतःच दुरुस्त करावा लागतो आणि फरशी स्वतः धुवावी लागते. तुम्हाला तुमचा नाश्ता, चहा आणि कॉफी देखील स्वतः बनवावी लागते”.

 हेही वाचा – ‘या’ प्रसिद्ध गायकावर तब्बल चार महिलांनी लावला लैंगिक शोषणाचा आरोप, एकीला गाडीमध्येच…
अभिनेत्री पायल रोहतगीचे गॅंन्ड वेडिंग रिसेप्शन, ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी
दिल्लीचा रजत सूद ठरला ‘इंडियाज लाफ्टर चैंपियन’, बक्षिस म्हणून मिळाली इतकी रक्कम

हे देखील वाचा