Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

तगड्या कलाकारांची फौज आणि प्रभावी अभिनय असूनही, प्रेक्षकांना बांधून ठेवण्यास ‘चेहेरे’ असमर्थ

कोरोनाचा प्रकोप कमी झाला तसे महाराष्ट्रासोडून इतर राज्यांमध्ये लॉकडाऊन नियम बऱ्यापैकी शिथिल करत चित्रपटगृह देखील ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे अक्षय कुमारने त्याचा बहुप्रतीक्षित आणि बहूचर्चित सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना आता दुसरा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याचे नाव आहे चेहेरे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा हा बहुप्रतीक्षित सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अतिशय भव्य स्टारकास्ट असणारा रुमी जाफरी यांचा हा सिनेमा एक कोर्टरूम ड्रामा आहे.

‘अगर आप में से किसी ने कोई अपराध या जुर्म किया है, तो बहुत संभल के यहां से गुजरिएगा, क्योंकि यह खेल आपके साथ भी खेला जा सकता है।’ या एका संवादावर हा सिनेमा आधारित आहे. चेहेरे सिनेमाचा ट्रेलर जेव्हा आला, तो पाहून सर्वांच्याच मनातील या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली होती. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये असमर्थ राहिला. कलाकारांचा उत्तम अभिनय असूनही हा सिनेमा प्रेक्षकांवर जादू चालवण्यात कमी पडला आहे. (chehere movie review)

चित्रपटाची कथा सुरू होते, मोठमोठ्या डोंगरांमध्ये राहणाऱ्या निवृत्त जज असणाऱ्या जगदीश आचार्य यांच्यापासून. जगदीश नेहमीच त्यांचे मित्र असलेले क्रिमिनल लॉयर लतीफ जैदी (अमिताभ बच्चन), रिटायर डिफेंस लॉयर परमजीत सिंह भुल्लर (अन्नू कपूर) या सर्व वयस्कर मित्रांसोबत महफिल सजवतात. सोबतच एक अनोखा खेळ देखील खेळतात. ज्यात एखादी केस कोर्टात जशी लढवतात तशीच लढवली जाते. मात्र आरोपीला निर्णय सांगण्यासोबतच शिक्षा देखील ठोकण्यात येते.

या खेपेला या खेळात इम्रान हाशमी आरोपी बनतो. इम्रान एका मोठ्या जाहिरात कंपनीचा सर्वेसर्वा आहे, जो वादळात अडकून या सर्वांच्या घरात आसरा घेतो. हे सर्व मित्र इम्रानसोबत खेळ खेळण्यास सुरुवात करतात. खेळाच्या सुरुवातीलाच अमिताभ सांगतात की, ‘आमच्या कोर्टात न्याय नाही तर जजमेंट केले जाते. मात्र इमरान हा खेळ गंभीर घेत नाही. टाईमपास समजत तो हा खेळ खेळण्यास सुरुवात करतो. पुढे या खेळात काय होते, इमरान हा खेळ कसा खेळतो हे बघण्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल.

अभिनयाबद्दल सांगायचे झाले तर सिनेमात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी, अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूजा यांचा अभिनय दमदार आहे. रिया चक्रवर्ती मात्र अभिनयात काहीशी कमजोर वाटते. दमदार कलाकार मंडळी असून देखील सिनेमा प्रेक्षकांना बांधून ठेवत नाही. चित्रपट बघताना कथा अजून चांगली असू शकली असती असे अनेकदा वाटते. पण ट्रेलरच्या तुलनेत चित्रपट खूपच निराशा करतो.

 

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा