Friday, July 5, 2024

एकेकाळी नशेत बुडालेले बिग बी, आज आरोग्याची घेतात पूर्ण काळजी; ‘त्या’ व्यक्तीमुळे घेतला होता महत्वाचा निर्णय

जगभरातील लोक गोव्याला जाऊन दारू पितात. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, महानायक अमिताभ बच्चन यांनी गोव्याला जाऊन दारू सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी त्यांच्या मित्राच्या सल्ल्यावरून घेतला, जो त्यांच्यासाठी खूप योग्य ठरला. जाणून घेऊयात बिग बींच्या आयुष्याला वळण देणारा तो किस्सा…

अमिताभ यांच्या या मित्राचे नाव अनवर आहे, जो त्यांचा बॉलिवूडमधील सर्वात जुना मित्र असल्याचे म्हटले जाते. या घटनेबाबत बोलताना अनवर म्हणाले की, “आम्ही एकदा गोव्यातील मंडोवी हॉटेलमध्ये होतो. मी गोल्ड स्पॉट पीत होतो. मी अमितला उत्साहाने व्हिस्की, रम पिताना पाहिले. त्यावेळी त्याने खूप अधिक मद्यपान केले. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही शॉवर घेत होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही शॉवर घेत होतो. मग मी म्हणालो, अमित ही तुझी सुरुवात आहे. कलाकारासाठी दारू हराम आहे. तुला आयुष्याचा टप्प्याटप्यावर दारू ऑफर करणारे आणि पाजणारे मिळतील. पण त्यापासून दूर राहून तू तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकतोस.” (amitabh bachchan happy birthday here is the secret of big b fitness in this age)

मग अमिताभ म्हणाले, “अन्नू तुझं म्हणणं मला पटतंय. आजपासून माझ्यासाठी दारू हराम आहे.” तेव्हा त्यांनी व्हिस्कीची बाटली घेतली आणि फोडली. ते म्हणाले, “ले बिडू तुझ्या मैत्रीसाठी हे सोडून दिलं.” हे सांगताना अनवर म्हणाले की, “मला आनंद आहे की अमितने पुन्हा दारूला स्पर्श केला नाही. बाबूजी आणि आईचे संस्कार, विचार आणि आदर्श तसेच, त्याच्या समर्पणाने त्याला महानायक बनवले.”

एकेकाळी दारूच्या नशेत बुडालेले अमिताभ आज त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत, त्याची काळजी घेतात. ज्या वयात लोक विश्रांती घेत असतात, त्याच वयात बिग बी दिवसाला १६ तास काम करतात. या वयातही त्याच्या तंदुरुस्तीचं रहस्य काय आहे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतच असेल. जाणून घेऊया त्यांचा फिटनेस मंत्र…

-बिग बींच्या फिटनेसचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे, ते मिठाईपासून दूर राहतात. ते चॉकलेट आणि पेस्ट्री खाणे टाळतात. वास्तविक, या गोष्टींमध्ये भरपूर फॅट आणि कॅलरीज असतात, जे आरोग्यास हानी पोहोचवतात.

-अमिताभ बच्चन अनेक चित्रपटांमध्ये सिगरेट ओढताना आणि दारू पिताना दिसत असले, तरी क्वचितच लोकांना माहित असेल की, वास्तविक जीवनात ते या दोन गोष्टींना स्पर्शही करत नाहीत.

-शिवाय सिगारेट-दारू व्यतिरिक्त बिग बींना चहा-कॉफी प्यायलाही आवडत नाही. तसं तर त्यांना कॉफी पिण्याची आवड आहे, पण त्यात असलेल्या कॅफीनमुळे त्यांनी ते देखील सोडले आहे.

-मांसाहाराचे शौकीन असलेले बिग बी आता तेही टाळतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या एका पोस्टद्वारे सांगितले होते की, ते आणि त्यांची पत्नी जया दोघेही शुद्ध शाकाहारी झाले आहेत.

-यासोबतच अमिताभ बच्चन रोज वर्कआउट करतात. ते दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉकने करतात आणि त्यानंतर योगा करणे त्यांना आवडते. नियमित व्यायाम हेच त्यांच्या फिटनेसचं मुख्य कारण आहे. एवढेच नाही तर ते दररोज ध्यान देखील करतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा