बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच शूटिंग दरम्यान ते जखमी देखील झाले होते. त्यानंतर शूटिंग थांबवण्यात आली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती सर्वांना दिली होती. त्यानंतर सर्वांनाच त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता वाटत होती. अशातच बिग बी हे बरे झाले आणि त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. सर्वांनाच हायसे वाटले होते. पण आता पुन्हा त्यांना अराम सांगितलं असून, शूटिंग न करण्याचा सल्ला दिला गेल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉग मधून ते पुन्हा कामावर हजर झाल्याचे सांगितले होते. शूटिंग दरम्यान झालेल्या दुखापतीनंतर काही काळ अराम करून त्यांनी पुन्हा शूटिंगला सुरुवात केली होती. त्यांच्या या अपडेटमुळे त्यांच्या फॅन्ससह सर्वच खूप खुश होते. त्यांना शुभेच्छा देत काळजी घेण्याचे आवाहान देखील करत होते.
मात्र आता यातच बच्चन परिवारातील जवळच्या व्यक्तीने केलेल्या खुलाश्यानुसार बिग बी अजून पूर्णपणे ठीक झाले नसून, त्यांना बरे होण्यासाठी अजून थोडा काळ लागणार असलीच सांगितले आहे. अमिताभ यांना शूटिंगदरम्यान बारगड्याना लागलेल्या मारामुळे तर अजून पूर्णपणे बरे झालेले नाही. ते एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी बाहेर निघाले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना असे करण्यास मज्जाव सांगितला आहे. त्यांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी देखील आता आराम करायचे ठरवले आहे.
त्या व्यक्तीने हे देखील सांगितले की, बच्चन साहेबाना देखील लवकरच कामावर परतायचे मात्र त्यांची बरी होण्याची प्रक्रिया हळू होत असल्याने वेळ लागत आहे. या वयात कोणतीही धोका घेणे योग्य नाही. शूटिंग सुरु होईल मात्र त्याला वेळ लागणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याचे फॅन्स अमिताभ बच्चन लवकरच पूर्ण बरे हाणून कामावर परतण्यासाठी प्रार्थना करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?










