Saturday, June 29, 2024

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यात घडली ‘ही’ भयावह घटना; घरातील सदस्यांचाही उडाला थरकाप

‘महानायक’ अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते आहेत. ते आपल्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक रंजक गोष्टी आणि घटना ते सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तसेच त्याविषयी त्यांच्याकडून सल्ले घेत असतात. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरातील एक भयावह घटना सांगितली. यामुळे घरातील मंडळी खूपच घाबरून गेल्याचेही त्यांनी सांगितले होते.

अमिताभ बच्चन यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल, कामाबद्दल ते आपल्या चाहत्यांशी चर्चा करत असतात. अमिताभ बच्चन यांना ब्लॉग लिहिण्याची आवड असल्याने ते त्यांच्या खास शैलीत आपल्या चाहत्यांसोबत हितगुज साधत असतात. यामध्ये ते काव्यरचना करत आपले विचार मांडत असतात. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘जलसा’ निवासस्थानी एक वटवाघूळ शिरले असून अनेक उपाय केल्यानंतरही ते जात नसल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. (Amitabh Bachchan house jalasa has bat problem says family members are scared)

आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन लिहतात की, “या सगळया गोष्टींच्या चर्चेनंतर आणखी एक गोष्ट लक्षात आली, वटवाघूळ… एवढी दक्षता घेऊनही काल पुन्हा त्याच्याशी सामना झाला. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी घरातील सगळी साधने गोळा केली गेली. ज्यामुळे घरातील सदस्यांची सुटका होईल.”

चाहत्यांकडे मागितली मदत
या ब्लॉगमध्ये बिग बींनी या वटवाघळाला घरातून हाकलण्याच्या उपाय योजना आपल्या चाहत्यांना विचारल्या आहेत. ज्यामध्ये ते लिहतात. “नाही नाही मला ईएफ ब्रिगेडकडून काही सल्ला नकोय. मात्र, तुमच्याकडे अशा काही उपाययोजना असतील ज्या आम्ही आजपर्यंत केल्या नाहीत, तर आम्हाला नक्की सांगा. आम्ही धुराडी केली, निर्जंतुकीकरण द्रवाचा मारा केला, विद्युत उपकरणाचा वापरही केला. यापेक्षा चांगला पर्याय म्हणजे निलगिरीच्या तेलाचा सगळीकडे मारा करणे.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बोट फ्रॅक्चर असल्याची दिली होती माहिती
दरम्यान अमिताभ बच्चन यापूर्वीही अनेकदा आपल्या समस्या आणि खासगी बाबी चाहत्यांशी शेअर करताना दिसून आले आहेत. अलीकडेच त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांचा ब्लॅक एँड व्हाईट पेहरावातील फोटो शेअर करत त्यांच्या नवीन बूटाविषयी चाहत्यांना माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाल्याने त्यांचे जुने ब्लॅक पेटेंड लेदर बूट घालता येत नसल्याचेही सांगितले होते.

अमिताभ बच्चन यांच्या या ब्लॉगला चाहते सुद्धा भरभरून प्रतिसाद देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

हे देखील वाचा