Sunday, December 3, 2023

रेखा नव्हे अमिताभ बच्चन यांना ‘या’ बंगाली मुलीने लावले होते वेड, वाचा पहिल्या प्रेमाचा रंजक किस्सा

बॉलिवूडमध्ये दररोज सेलिब्रिटींच्या नात्याच्या अफवा उडत असतात. दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या बातम्या मीडियामध्ये येत असतात. पण आजही सिनेविश्वातील सर्वात लोकप्रिय प्रेमकथा असेल तर ती अमिताभ आणि रेखा यांची. या जोडीचा रोमान्स ऑनस्क्रीन सुपरहिट ठरल्यानंतर ऑफस्क्रिनही कधी बहरला ते कळलेच नाही. पण रेखा (Rekha) आणि अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांचे प्रेम पूर्ण होऊ शकले नाही कारण त्यांच्या कुटुंबीयांना अभिनेत्याने जयाशी लग्न करावे अशी इच्छा होती. पण तुम्हाला माहित आहे का की अमिताभ बच्चन यांचे पहिले प्रेम रेखा नसून UK कंपनी ICI मध्ये काम करणारी मुलगी होती. 

त्या दिवसांची गोष्ट आहे, जेव्हा अमिताभ बच्चन सिने जगतापासून दूर एका सामान्य मुलासारखे काम करून आपले आयुष्य जगत होते. त्यावेळी अभिनेते त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीवर प्रेम करत होते. होय, अमिताभ पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडले. वास्तविक, अमिताभ बच्चन जेव्हा कोलकात्यात काम करायचे, त्या काळात त्यांच्यासोबत एक मुलगीही काम करायची. महिन्याला 1500 रुपयांची नोकरी करणारे अमिताभ ज्या मुलीवर प्रेम करत होते. त्या मुलीचे नाव चंदा होते.

त्यावेळी ते चंदाच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की त्यांना तिच्याशी लग्नही करायचे होते. अमिताभ आणि चंदा यांची पहिली भेट थिएटरमध्ये नाटक पाहताना झाली होती. दोघांचं नातं पूर्ण तीन वर्षं टिकलं, पण अमिताभचं पहिलं प्रेमही शेवटपर्यंत पोहोचलं नाही. वास्तविक चंदा आणि अमिताभ यांचे लग्न होऊ शकले नाही. जेव्हा त्यांच्या लग्नाचे प्रकरण काही निष्पन्न झाले नाही तेव्हा बिग बी नोकरी आणि कोलकाता दोन्ही सोडून मुंबईत आले. अमिताभ यांच्यासोबत त्या तीन वर्षांत काम केलेले त्यांचे मित्र दिनेश कुमार यांनी याचा खुलासा केला आहे. दिनेशने पुढे म्हटले होते की, ‘जेंव्हा चंदाचे लग्न झाले नव्हते, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी कोलकात्याला अलविदा केला होता आणि नोकरीही सोडली होती, त्यानंतर बिग बींचा 26 दिवसांचा पगारही कापण्यात आला होता.’

अमिताभ बच्चन प्रेमात पडलेल्या मुलीने बंगाली सिनेमात तिच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या चंदा यांनी इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले. बिग बींवरील प्रेम पूर्ण न झाल्याने चंदाने बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
 नॅशनल क्रश बनली ‘जलपरी’,आवर्जून पाहा फाेटाे
रक्षा अन् कल्लूच्या व्हिडिओनं वेधलं सगळ्याचं लक्ष; अभिनेत्री म्हणाली, ‘सइयां के राखब साडी…’

हे देखील वाचा