Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड बिग बींनी लिहिली चुकीची स्पेलिंग, चाहत्याने चूक दाखवताच अभिनेत्याने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बिग बींनी लिहिली चुकीची स्पेलिंग, चाहत्याने चूक दाखवताच अभिनेत्याने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन हे असे अभिनेते आहेत, जे नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. दररोज ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या भावना शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली. या पोस्टवर त्यांच्या चाहत्याने त्यांना ती चूक सांगितली आणि या चाहत्याच्या कमेंटवर बिग बींनी देखील चांगली प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, त्यात त्यांनी चुकीचे इंग्रजी लिहिले आहे. या चुकीकडे त्यांच्या एका चाहत्याचे लक्ष गेले आणि त्याने कमेंट करून अमिताभ यांना ती चूक लक्षात आणून दिली. अमिताभ यांनीही ही चूक मोठ्या शालीनतेने मान्य करून, मोठे मन दाखवून ती लगेच सुधारली. एवढेच नाही तर त्या चाहत्याचे आभारही मानले. (amitabh bachchan mistake was corrected by a fan actor gave befitting reply)

Photo Courtesy Instagramamitabhbachchan

हा चाहता राजेश पांडे असून, तो पटनाच्या मालसलामी पोलीस स्टेशन परिसरातील नंदगोला येथील रहिवासी आहे. त्याने बच्चन यांना पटना येथे येऊन छठपूजा करण्याचे आवाहनही केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी राजेश कुमार यांनी ‘दशहरा’ या शब्दाच्या स्पेलिंगवर अमिताभ बच्चन यांचे लक्ष वेधले होते. ती पोस्टही या पोस्टप्रमाणे व्हायरल झाली होती.

Photo Courtesy Instagramamitabhbachchan

खरं तर, अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवर सलीम-जावेद या प्रसिद्ध जोडीला इंग्रजीत ‘डुओ’ ऐवजी ‘दुआ’ लिहिण्याची चूक केली. यावर राजेशने त्यांना त्यांची चूक दाखवून दिली, जी बिग-बींनीही लगेचच स्वीकारले आणि ती चूक सुधारली. राजेश यांनी बच्चन यांना पटना येथे येऊन छठ मैय्याचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा