Friday, July 5, 2024

खास किस्सा: अफगाणिस्तानात ‘खुदा गवाह’च्या शुटिंगवेळी अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी अर्धी एयरफोर्स होती

सध्या संपूर्ण जगात एकच मोठा विषय आहे, आणि तो म्हणजे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आणि संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. सध्या देशपरदेशात हा एकच विषय सर्वांच्या चर्चेचा बनला आहे. मनोरंजन सृष्टीच्या नजरेतून पाहिले तर अफगाणिस्तान आणि बॉलिवूड यांचे खूपच जवळचे आणि गहिरे नाते आहे. अनेक हिंदी चित्रपटांच्या शूटिंग अफगाणमध्ये झाल्या आहेत. यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘खुदा गवाह.’

‘खुदा गवाह’ सिनेमातील ‘बुजकसी’ नावाचा खेळ मजार शरीफ जवळ अतिशय अवघड परिस्थितीमध्ये हा खेळ चित्रित झाला होता. त्यावेळचे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती नजीबुल्लाह अहमदजई अमिताभ बच्चनचे खूप मोठे फॅन होते. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अफगाणिस्तानची अर्धी एयरफोर्स अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी तैनात होती. २०१३ साली अमिताभ यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबद्दल सांगितले होते. (amitabh bachchan on shooting film khuda gawah in afghanistan)

अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते, “अफगाणिस्तानचे राष्ट्रपती नजीबुल्लाह अहमदजई हे हिंदी चित्रपटाचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांना मला भेटण्याची खूप इच्छा होती. एकदा त्यांनी मला भेटण्यासाठी आमंत्रित केले आणि मला अतिशय रॉयल, व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. अनेक सुरक्षा रक्षकांसोबत त्यांनी आम्हाला या देशाची सैर करवली. आमचे अगदी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले गेले. आम्ही हॉटेलमध्ये कधीच नाही थांबलो, आमच्यासाठी एका कुटुंबाने त्यांचे घर रिकामे केले होते.”

पुढे अमिताभ बच्चन लिहितात, “तिथे सुरक्षेच्या खूपच समस्या होत्या. टॅंक आणि जावं नेहमीच रस्त्यावर दिसायचे. तो काळ माझ्या आयुष्यातील खूप चांगला काळ होता. जेव्हा आम्हाला जेवायला बोलावले गेले, तेव्हा मी, डॅनी, बिलू, मुकुल हेलीकॉप्टरमधून गेलो होतो. त्यांच्याकडे एक पद्धत होती की, पाहुण्यांचे पाय कधीच जमिनीवर पडत काम नये, म्हणून आम्हाला उचलून घेतले गेले. त्यानंतर आम्हाला बुजकसी टूर्नामेंटमध्ये नेले गेले. आम्हाला खूप भेटवस्तू दिल्या गेल्या. आज मला माहित नाही माझे स्वागत ज्यांनी केले, ते कुठे आहेत.”

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

व्यायाम तर केलाच पाहिजे! अमिताभ यांच्यापासून ते करीनापर्यंत ‘या’ कलाकारांनी घरातच बनवलीये जिम

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

 

हे देखील वाचा