सध्या चित्रपट क्षेत्रात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘झुंड’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. सामान्य प्रेक्षकांपासून ते अगदी चित्रपट जगतातील अनेक कलाकारांनी या चित्रपटाच्या कथेचे कौतुक केले आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जिवनकथेवर आधारित आहे. यामधील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र विजय हे नाव आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका हे एक विशेष समीकरण अनेक वर्षांपासून चालत आले आहे, काय आहे हा संबंध चला जाणून घेऊ.
महानायक अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपट जगतातील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या अभिनय क्षेत्राच्या दमदार कारकिर्दित त्यांनी असंख्य दमदार भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये त्यांच्या जास्तीत जास्त चित्रपटात विजय हे नाव दिसले आहे. त्यांच्या झुंड चित्रपटाप्रमाणेच इतरही अनेक विजय नावाच्या व्यक्तीरेखा गाजलेल्या आहेत.
जंजीर– अमिताभ बच्चन यांचा ‘जंजीर’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात त्यांनी विजय खन्ना नावाची व्यक्तीरेखा साकारली होती. चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.
दिवार – अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या आणि प्रसिद्ध चित्रपटात ‘दिवार’चा प्रामुख्याने समावेश होतो. या चित्रपटातही अमिताभ बच्चन यांनी विजय वर्मा नावाची व्यक्तीरेखा साकारली होती. या चित्रपटातील फेंके हुए पैसे आज भी नही लेता हा डायलॉग त्या काळात गाजला होता.
डॉन – ‘डॉन’ चित्रपट म्हणले की अमिताभ बच्चन यांची दमदार भूमिका आणि डॅशिंग अभिनयाचे चित्र लगेच डोळ्यासमोर उभे राहते. या चित्रपटातही अमिताभ बच्चन यांनी विजय पाल यांंची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी डॉन आणि विजय पाल अशी दुहेरी भूमिका साकारली होती.
अग्निपथ – बिग बी अमिताभ बच्चन यांच्या विजय दिनानाथ चौहान भूमिकेने ‘अग्निपथ’ चित्रपट चांगलाच गाजला होता . आजही या चित्रपटाचे आजही कौतुक केले जाते. या चित्रपटातही त्यांच्या पात्राचे नाव विजय असेच होते.
शहंशाह – अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटात ‘शहंशहा ‘चित्रपटाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय श्रीवास्तव नावाची व्यक्तीरेखा साकारली होती.
दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा