अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सगळ्यात नामवंत कलाकार आहेत. जवळपास ६ दशके त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांचे ‘शोले’ सिनेमातील पात्र आजही लोकांना फार आवडते. त्यांची लव्हलाफइही तितकेच चर्चेत राहिले होते. त्यांनी जया बच्चनसोबत ३ जून १९७३ मध्ये प्रेमविवाहात अडकले होते. दोघाचे लग्न परिवाराच्या संमतीने झाले होते. दोघांच्या लग्नामध्ये कुटुंबातील काही लोक आणि त्यांचे खास मित्रपरिवार सहभागी झाले होते. जया बच्चन या बंगाली कुटुंबातील आहेत आणि अमिताभ बच्चन हे उत्तर प्रदेशमधील कायस्थ कुटुंबातील आहेत. त्यांचा जन्म ११ आोक्टबर १९४२ मध्ये झाला होता. ते आता ७९ वर्षाचे आहेत. जया बच्चन यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ मध्ये झाला होता. त्या आता ७३ वर्षाच्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी एकदा ‘कौन बनेगा करोड़पती’च्या सेटवरती एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी त्यांच्या मोबाइल फोनमध्ये जया बच्चन यांचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहे, याचा खुलासा केला आहे. शोच्या एका सदस्यांशी बोलते वेळेस त्यांच्या मोबाइल फोनमध्ये पत्नी जया बच्चन यांचा नंबर जेबी या नावानी सेव्ह केला आहे, हे त्यांनी सांगितले. जेबी हे जया बच्चनचे शॉर्टफॉर्म आहे. हे दोघे पती पत्नी तर आहेतच, परंतु काही चित्रपटामध्येही त्यांनी सोबत काम केले आहे. दोघांनी सोबत ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘सिलसिला’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांना श्र्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन असे दोन मुले आहेत. त्यांचे दोघेही मुले विवाहित आहेत.
जया बच्चन त्यांच्या राजकीय घडामोडीमुळेही खूप चर्चेत असतात. त्या स्त्रीशक्तीकडे जास्त लक्ष देतात, आणि वेळोवेळी अन्याय करणाऱ्या विरोधात आवाज उठवतात. अमिताभ बच्चन हे नुकतेच ‘झुंड’ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. ‘सैराट’च्या अभूतपुर्व यशानंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट पाहण्यास प्रेक्षक आतुरले आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरही झळकणार आहे.
हेही वाचा