Monday, July 1, 2024

भल्या पहाटे अमिताभ बच्चन यांनी उलगडले सोशल मीडियाचे रहस्य; नेटकरी म्हणाले, ‘झोपा आता’

बाॅलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. यामार्फत ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. अमिताभ नुसते फोटो आणि व्हिडिओच सोशल मीडियावर शेअर करत नाहीत, तर ते आपले मतही सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. अमिताभ यांनी अलिकडेच एक ट्वीट केले आहे आणि त्याचबरोबर स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे. या ट्विटमुळे अमिताभ बच्चन प्रचंड चर्चेत आले आहेत.

बच्चन यांना सोशल मीडियावर प्रचंड फॅन फोलविंग आहे. त्यांची एकही पोस्ट चाहत्यांच्या नजरेआड होत नाही. अनेकदा बच्चन यांना ट्रोलही केले जाते. तसेच अनेकदा त्यांचे चाहते स्तुती करताना थकत नाहीत. अमिताभ यांनी असेच एक ट्वीट केल्यामुळे आता त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. त्यांनी बुधवारी (१८ऑगस्ट) पहाटे २.२५ वाजता ट्वीट केले आहे.

बच्चन यांनी ट्विटवर लिहिले की, “सोशल मीडियावर दररोज सुमारे ३००दशलक्ष फोटो शेअर केले जातात. हे सत्य आहे. सत्य आहे! मग ते सिद्ध करण्यासाठी गरज आहे का?” यासह त्यांनी स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ हसत असून टाळ्या वाजवताना दिसत आहेत. यावरुन अनेक युजर्स संतापले आहेत. त्यांना ट्रोल केले जाते आहे. एक युजर म्हणाला की, “झोपा आता.”

बच्चन यांनी या आधीही लिहिले होते की, “काहीच लिहायचं नाही.” त्यावरूनही त्यांना प्रचंड ट्रोल केले होते. नेटकरी म्हणाले, “तुम्ही फक्त महागाईवर काहीतरी लिहू शकता.”

अनेकवेळा अमिताभ यांचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अमिताभ यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ शो २३ ऑगस्ट २०२१पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. तसेच हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री ९वाजता प्रसारित केला जाईल.

बच्चन यांनी यावेळी टीव्हीवर शोची जाहिरात करण्यासाठी नवीन मार्ग निवडला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्मिते नितेश तिवारी यांनी केबीसीवर तीन लघुचित्रपट बनवले आहेत. त्यात अभिनेता ओंकार दास माणिकपुरीचे मुख्य पात्र निभावत आहे. यावेळी ‘केबीसी १३’ची टॅगलाईन आहे “प्रश्न काहीही असो, उत्तर तुम्ही आहात.”

अमिताभ यांच्या आगामी चित्रपट बोलायचं झालं, तरआयान मुखर्जींच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. तसेच ते सध्या ‘झुंज’ चित्रपटाच्या तयारीत गुंतले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर

-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?

हे देखील वाचा