Tuesday, July 9, 2024

अमिताभ बच्चन यांनी पत्नीसोबतचा थ्रो बॅक फोटो शेअर करून, दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीच्या निमित्ताने अनेक कलाकार सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. दिवाळी हा दिव्यांनी संपूर्ण जगाला तेजोमय करण्याचा सण. या दिवशी सगळेच दिव्यांची रोषणाई करतात. कुटुंबाने एकत्र येऊन साजरा करण्याचा हा सण आहे. अशातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक थ्रो बॅक फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यांनी तरुणपणातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन दिसत आहे. ते दोघेही फुलबाजा पेटवताना दिसत आहे. त्यांनी हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. (Amitabh Bachchan share a throw back photo with jaya bachchan and give best wishes of diwali )

हा फोटो शेअर करून त्यांनी “हॅप्पी दिवाली” असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहे.‌ त्यांचे चाहते या फोटोवर कमेंट करून त्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. तर काहींना जया आणि अमिताभ यांचा थ्रो बॅक फोटो खूप आवडला आहे. आजही ते तेवढेच फिट दिसतात.

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील एक प्रतिभावान अभिनेते आहेत. ८० च्या दशकापासून ते आजतागायत अमिताभ इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि रसिकांचे मनोरंजन करत आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह आणि मेहनत एखाद्या तरुण कलाकाराला लाजवेल असा असून, ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सुत्रसंचालन करत आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी ‘शोले’, ‘मर्द’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘सुर्यवंशम’, ‘मोहाबते’, ‘पा’, ‘डॉन’, ‘कूली’, ‘दिवार’, ‘चेहरे’, ‘पिंक’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा

तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा