Saturday, July 6, 2024

‘सर्वांना वाटायचे माझी दृष्टी गेली आहे’, चष्मा घातलेला जुना फोटो शेअर करत बिग बींचा खुलासा

बॉलिवूडचे महानायक, बिग बी अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते म्हणजेच अमिताभ बच्चन हे कायमच आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियामार्फत गप्पा मारताना दिसतात. आपल्या आयुष्यात घडलेले काही मजेदार किस्से असो किंवा कठीण प्रसंग असो ते कायमच आपल्या चाहत्यांशी संपर्कात असतात. मागील काही दिवसापासून सगळेच कोरोनामुळे घरी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशातच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत बऱ्याचदा अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरून काहीतरी शेयर करताना दिसत आहेत. नुकताच अमिताभ यांनी त्यांचे एक मस्त फोटो शेअर केले आहे.

बिग बी यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये ते जांभळा कोट आणि काळ्या रंगाची कडा असलेला मोठा चष्मा परिधान करताना दिसत आहे. ज्यात ते नेहमीसारखेच हटके दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी एक खुलासाही केला आहे.

फोटो शेअर करत बिग बींनी लिहिले की, ‘काय दिवस होते ते.’ त्यांनी पुढे असेही लिहिले की, ‘ज्या दिवसांत सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये चष्मा घालणे चांगले मानले जात नसत, तेव्हा लोक विचार करायचे की, माझी दृष्टी गेली आहे.’

अभिनेता रणवीर सिंगनेही त्यांचा हा फोटो बघताच एक खास कमेंट केली आहे. त्याचबरोबर बिग बींचा हा फोटो चाहत्यांनाही आवडला आहे. चाहते या फोटोवर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.

काही दिवसांपूर्वी मेडिसन स्केअर गार्डनमध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा प्रत्यक्ष सादरीकरण केले होते, तेव्हाचा त्यांनी  आणखी एक मस्त फोटो शेअर केला होता. त्यांनी शेअर केलेल्या फोटोत तरुण अमिताभ मायक्रोफोनसह दिसले होते. त्याचवेळी मागे असलेल्या बोर्डवर हे लिहिले होते, ‘आज रात्री प्रत्यक्ष सादरीकरण अमिताभ बच्चन.’

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘१९८३, माझे पहिले प्रत्यक्ष सादरीकरण.. जगातील सर्वात प्रतिष्ठित स्टेडियममध्ये प्रथमच भारतीय कलाकार प्रत्यक्ष सादरीकरण.’ यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. खास म्हणजे त्यांची नात नव्या नवेली हिने पण खास प्रतिक्रिया दिली आहे. बिग बींनी नुकतेच चित्रपटसृष्टीत ५२ वर्षे पूर्ण केली आहेत. बिग बी लवकरच ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ आणि ‘मायडे’ चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टीव्हीवर सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा ‘टॉपलेस’ बोल्ड अवतार पाहून चाहतेही चक्रावले!

-दु:खद! ‘यमला पगला दीवाना’ फेम अभिनेते अमित मिस्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

-‘हिंमत असेल तर खऱ्या नावाने कमेंट्स कर’, अश्लिल कमेंट्स करणाऱ्या युजरला वहिनीसाहेबांचा दणका

हे देखील वाचा