Tuesday, July 23, 2024

अमिताभ बच्चन यांनी रश्मिकासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी घेतली त्यावर बिग बी यांची मजा

अमिताभ बच्चन यांनी काळाप्रमाणे बदलत स्वतःमध्ये प्रत्येक पिढीशी जोडले जाणारे अनेक बदल स्वतःमध्ये केले. आजच्या काळाची गरज बघता अमिताभ यांनी सोशल मीडिया समजून घेत त्यावर सक्रिय होण्याचे प्रमाण वाढवले. आज ते बॉलिवूडमधील सोशल मीडियावरील सक्रिय कलाकारांच्या यादीत टॉपवर येतात. ते सतत काहींना काही सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. नुकताच अमिताभ यांचा ‘झुंड’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला. आता लगेच अमिताभ त्यांच्या पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागले आहे. लवकरच ते नॅशनल क्रश असणारी रश्मिका मंदानासोबत ‘गुडबाय’ सिनेमात दिसणार आहे.

सध्या अमिताभ आणि रश्मिका या सिनेमाची हरिद्वार आणि ऋषिकेश येथे शूटिंग करत आहे. याच शूटिंग सेटवरचा एक फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते रश्मिकासोबत दिसत असून, रश्मिका फोटोमध्ये खळखळून हसताना दिसत आहे, तर अमिताभ तिच्याकडे प्रेमाने बघत आहे. अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत आहे. मात्र ही पोस्ट व्हायरल होण्यामागे आणि चर्चेत येण्यामागे या फोटोला अमिताभ यांनी दिलेले कॅप्शन कारणीभूत ठरताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा आणि रश्मिकाचा हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘पुष्पा’ असे लिहिल्यामुळे यावर आता नेटकरी त्यांची मजा घेताना दिसत आहे. काही महिन्यापूर्वी रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांचा ‘पुष्पा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला देखील. या सिनेमातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांच्या भूमिका आणि त्यांची नावे देखील तुफान हिट झाली. मात्र जेव्हा बिग बी यांनी या फोटोला ‘पुष्पा’ म्हटले तेव्हा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांना सांगितले की, “पुष्पा नाही सर श्रीवल्ली’. कारण सर्वांनाच माहित आहे की, या सिनेमात अल्लू अर्जुनाचे नाव पुष्पा तर रश्मिकाचे नाव श्रीवल्ली होते. कदाचित अमिताभ बच्चन यांचा नावात गोंधळ झाल्यामुळे त्यांनी असे कॅप्शन दिल्याचे अनेकांना वाटत असेल. मात्र त्यांनी ‘पुष्पा’मध्ये रश्मिका मुख्य भूमिकेत असल्यामुळे देखील असे कॅप्शन दिल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

अमिताभ यांच्या या पोस्टवर रश्मिकाने देखील तिची मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तिने सोशल मीडियावर ही पोस्ट स्टोरीमध्ये शेअर करताना लिहिले, “सर आम्ही झुकणार नाही.” हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “फक्त, फक्त आणि फक्त कृतज्ञता, हसणे आणि प्रेम करणे.” लवकरच अमिताभ बच्चन आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत ब्रह्मास्त्र सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा