Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड अभिषेकसोबतचा फोटो शेअर करत बिग बींनी दिला खास संदेश; म्हणाले ‘मुलगा वडिलांचे…’

अभिषेकसोबतचा फोटो शेअर करत बिग बींनी दिला खास संदेश; म्हणाले ‘मुलगा वडिलांचे…’

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहून, बच्चन कुटुंबाचे फोटो शेअर करत असतात. मुलगा अभिषेकवर त्यांना खूप अभिमान आहे. ते अनेकदा सोशल मीडियावर अभिषेकचे कौतुक करत असतात.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी ‘बंटी बबली’ आणि ‘सरकार’ यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, ज्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. आता बिग बींनी आपला मुलगा अभिषेक बच्चन याच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्यांनी अभिषेकला आपला मित्र म्हणत एक कॅप्शन लिहिले आहे.

अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसोबतचा हा खास फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत अभिषेक बच्चन एका बाजूला हाताने खुणावताना दिसत आहे. त्याचवेळी बिग बी हाताच्या दिशेने काळजीपूर्वक पाहत आहेत. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी लिहिले की, “जेव्हा तुमचा मुलगा तुमचे बूट घालायला लागतो आणि कोणता मार्ग योग्य आहे हे सांगू लागतो, तेव्हा तो तुमचा मुलगा नाही राहत, तर तो तुमचा मित्र बनतो. ऑल द बेस्ट बड्डी.”

वडील आणि मुलाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिग बींनी शेअर केलेल्या या फोटोत अमिताभ आणि अभिषेक दोघांनी शेरवानी परिधान केलेली दिसत आहे. यात दोघेही खूपच हँडसम दिसत आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वत: अभिषेकनेही इमोजी पोस्ट करून लाईक केले आहे.

अलीकडेच अमिताभ बच्चन यांना ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्ह अवॉर्ड्स 2021’ या पूरस्काराने गौरविण्यात आले आहे. शुक्रवारी (19 मार्च) संध्याकाळी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात अमिताभ यांना हा सन्मान देण्यात आला. तसेच, अमिताभ बच्चन हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत.

अमिताभ यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर यावर्षी अमिताभ ‘झुंड’ आणि ‘चेहरे’ या दोन चित्रपटांत दिसणार आहेत. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ मध्येही अमिताभ दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.

त्याचबरोबर अभिषेक ‘दसवी’ शिवाय ‘बॉब विश्वास’ नावाच्या चित्रपटाचा एक भाग असणार आहे. हा चित्रपट शाहरुख खान निर्मित आहे. याशिवाय तो ‘बिग बुल’ चित्रपटाचाही एक भाग आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा