Wednesday, June 26, 2024

‘तू माझा आनंद, माझा अभिमान’, लेकासाठीची अमिताभ बच्चन यांची ‘ती’ भावूक पोस्ट व्हायरल

बॉलिवूडमध्ये ‘बिग बी’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अमिताभ बच्चन (amitabh bachchan) अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या चित्रपट, शो आणि जाहिरातींव्यतिरिक्त ते सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी जोडलेले असतात. ते रोज काही ना काही त्याच्या चाहत्यांशी शेअर करत असतो. अशातच त्यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. खरंतर, त्यांनी ही पोस्ट आपला मुलगा अभिषेक बच्चनसाठी (abhishek bachchan) केली आहे.

बॉलिवूडमध्ये वडील आणि मुलाच्या अनेक जोड्या प्रसिद्ध असल्या, तरी यापैकी एक जोडी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अनेकदा चर्चेत असतात. अभिषेक बच्चन जरी यशात वडिलांच्या मागे पडला असला, तरी त्याला लोकांचे खूप प्रेमही मिळते.अभिनय क्षेत्रात काही खास न करूनही अभिषेक अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात राहतो.

https://www.instagram.com/p/CfwuTf5N2WQ/?utm_source=ig_web_copy_link

अलीकडेच बिग बींनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगा अभिषेकसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने अभिषेकसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टद्वारे अमिताभ यांनी आपल्या मुलाचा अभिमान व्यक्त केला आहे. आजूबाजूला चाहत्यांनी वेढलेला हा फोटो शेअर करत बिग बींनी कॅप्शनमध्ये लिहिले, “तू माझा मुलगा आहेस म्हणून माझा वारसदार नाही तर, जो माझा वारसदार असणार तो माझा मुलगा असणार आहे, आणि अभिषेक तू माझा खरा वारसदार आहे. तूच माझा अभिमान आणि माझा आनंद आहेस.”

सोशल मीडियावर शेअर केलेले हे कॅप्शन पाहता, अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांचा एकमेकांशी खूप खास बॉन्ड आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. दोन्ही कलाकारांचे चाहतेही या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि वेगवेगळ्या कमेंट करून या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

अमिताभ बच्चन लवकरच सोनी टीव्हीच्या क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या नवीन सीझनसह पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी, KBC चा १४ वा सीझन लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. शोचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे आणि आता हा शो लवकरच टीव्हीवर प्रसारित होण्यासाठी सज्ज आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘काय लहान बाळासारखं रडतंय’, खिलाडी बनायला निघालेल्या निशांतच्या व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट

चक्क भर रस्त्यातच दगडूने धरला ठेका, पाहा नक्की काय झालं

विठ्ठल भक्तीत हरपलं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अश्विनी महांगडेचं देहभान, वारकऱ्यांबरोबरचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा