कलाकार आणि त्यांचे फोटोशूट हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हटके फोटोशूट करण्यासाठी कलाकार आणि फोटोग्राफर वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. दरवेळेस काहीतरी नवीन देण्याचा, काहीतरी हटके करण्याचा ते प्रयत्न करतात. फोटोशूटला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील अपवाद नाही. अमिताभ बच्चनसुद्धा अनेकदा वेगवेगळे फोटोशूट करताना दिसतात.
सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांच्या यादीत अमिताभ बच्चन हे नाव सर्वात वर येते. ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमी काही ना काही पोस्ट करतच असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला असून, हा फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी लाथ मारत असतानाच हा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तर चर्चेत आहेच सोबतच फोटोला दिलेले कॅप्शन देखील लक्ष वेधून घेत आहे.
अमिताभ यांचा हा एकदम ऍक्शन मूडमध्ये असलेला हा फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिले, “… उम्र हो गयी है , भई साहेब , लेकिन लात अभी भी चल रही है .. ” नेव्ही ब्लू रंगाचा सूट आणि त्यावर चश्मा घातलेल्या अमिताभ बच्चन यांचा हा अंदाज सर्वानाच खूप आवडत आहे. फॅन्ससोबतच कलाकार देखील या फोटोवर कमेंट्स करताना दिसत आहे. कार्तिक आर्यनने हा फोटो लाइक केला असून, मनीष पॉलने यावर फायर ईमोजी पोस्ट करत ‘sirrrrr’ लिहिले आहे. तर अभिनेता रोहित रॉयने लिहिले, “देव करो आणि वय आणि लाथ असेच चालू राहो.” अमिताभ बच्चन यांच्या एका फॅनने लिहिले, “वय हा फक्त एक आकडा आहे.”
अमिताभ बच्चन यांचा या वयातही असणारा फिटनेस आणि कामाबद्दल असणारी निष्ठा अनेकांसाठी प्रेरणा आहे. या वयातही ते प्रचंड उत्साहाने आणि न थकता काम करतात. सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या लोकप्रिय अशा ‘कौन बनेगा करोडपती’ शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘चेहेरे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यासोबतच लवकरच ते अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?
-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार
-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…