Friday, July 5, 2024

कधी सुरू होणार ‘KBC 14’? काय असतील यावेळी नियम? जाणून घ्या सर्वकाही

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत नाही, तर हा शो लोकांचे सामान्य ज्ञान देखील वाढवतो. त्यामुळेच हा शो पाहणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. या शोचे १३ सीझन सुपरहिट झाले आहेत, तर प्रेक्षक त्याच्या १४व्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे, कारण शोच्या प्रीमियरची तारीख समोर आली आहे.

लेटेस्ट प्रोमो आला समोर
‘कौन बनेगा करोडपती १४’चा नवा प्रोमो सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम हँडलवर रिलीझ झाला आहे, ज्याने चाहत्यांची उत्कंठा आणखीनच वाढवली आहे. कारण, यावेळी शोमध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये असे पाहिले जाऊ शकते की, शोचे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांचे १ कोटी रुपये जिंकल्याबद्दल अभिनंदन करतात आणि त्याला विचारतात की ते ७.५ कोटी रुपयांसाठी खेळतील की नाही. यावर समोर बसलेला स्पर्धक विचारात पडतो. (amitabh bachchan show kaun banega crorepati know details)

‘कौन बनेगा करोडपती १४’चा नवीन नियम
यानंतर अमिताभ बच्चन स्पर्धकाला सांगतात की, जर तुम्ही बरोबर उत्तर दिले तर तुम्हाला ७.५ कोटी रुपये मिळतील. पण जर तुम्ही चुकीचे उत्तर दिले तर तुम्हाला ७५ लाख रुपये मिळतील. हे ऐकून स्पर्धक आश्चर्यचकित झाला. कारण गेल्या केबीसी सीझनचा नियम असा होता की, १ कोटी खेळल्यानंतर तुम्ही हरलात तर तुम्हाला ३ लाख २० हजार रुपये मिळतील. मात्र, यावेळी शोमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. केबीसीच्या १४व्या सीझनमध्ये जर तुम्ही १ कोटी रुपये जिंकल्यानंतर हरलात तर तुम्हाला ३.२० लाख नाही तर ७५ लाख रुपये मिळतील. अमिताभ बच्चन यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांवर हा ट्विस्ट जोडला गेला आहे, ज्यानंतर स्पर्धक नक्कीच खूप आनंदी असतील.

कधी सुरू होतोय शो?
रिपोर्टनुसार, हा शो ८ ऑगस्ट २०२२ पासून सोनी टीव्हीवर सुरू होत आहे. खरं तर, लेटेस्ट मुलाखतीत अभिनेत्री विधी पंड्याने खुलासा केला आहे की, तिचा शो ‘मोसे छल किए जाए’ ५ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. जो सोनी वर रात्री ९.३० वाजता पाहण्यासाठी प्रसारित होता. अशा स्थितीत, हा टाईम स्लॉट रिकामा असेल. त्यामुळे ८ ऑगस्ट २०२२ पासून केबीसी १४ सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा