Wednesday, July 3, 2024

सेट मॅक्सवरील हक्काचा सिनेमा म्हणून ओळखल्या जाणारा ‘सूर्यवंशम’ आता ‘या’ चॅनेलवर दिसणार

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचा प्रत्येक जणं चाहता आहे. त्यांचे सिनेमे न पाहिलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. अमिताभ बच्चन यांचे जवळपास प्रत्येक चित्रपट हिट झाला आणि गाजला. मात्र त्यांचा एक सिनेमा असा आहे, जो हिट तर नाही झाला मात्र तुफान गाजला. त्या सिनेमाला टीव्हीने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. सर्वांच्या लक्षात आलेच असेल हा सिनेमा कोणता ते. बरोबर त्या सिनेमाचे नाव आहे ‘सूर्यवंशम’. हा सिनेमा न पाहिलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. सेट मॅक्स चॅनेलवर हा सिनेमा जवळपास रोजच दाखवला जातो. या सिनेमावर खूप मिम्स येतात आणि ते तुफान व्हायरल देखील होतात.

जरी ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा या चॅनेलवर सतत दाखवल्यामुळे सेट मॅक्स चॅनेलला अनेकदा टीकेचा देखील सामना करावा लागला मात्र या सिनेमाला सतत दाखवून देखील टीआरपी खूपच मिळते. मात्र आता हे नाते संपण्याच्या मार्गावर आहे. यापुढे हा सिनेमा या चॅनेलवर पाहता येणार नाही. २३ वर्ष जुना असलेला हा सिनेमा कदाचित पुढच्या वर्षांपासून या चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार नाही. एका रिपोर्टनुसार सेट मॅक्सकडे असलेले या सिनेमाचे हक्क आता संपुष्टात आले असून, पुढच्या वर्षांपासून हा सिनेमा या चॅनेलवर पाहता येणार नाही.

आता ‘सूर्यवंशम’ या सिनेमाचे अधिकार गोल्डमाइन टेलीफिल्म्सने विकत घेतले आहेत. लोकं जरी या सिनेमावर मिम्स बनवतात सिनेमाचा मजाक उडवत असले तरी मागील दीड वर्षात या सिनेमाने ३१ कोटी व्ह्यूज मिळवले असून, हे व्ह्यूज सतत वाढत देखील आहे. गोल्डमाइन टेलीफिल्म्सचे प्रमुख असलेले मनीष शाह यांना त्यांच्या ढिंचॅक बॉलिवूड या चॅनेलवर हा सिनेमा दाखवायचा आहे. सॊनीकडे या सिनेमाचे हक्क २०२४ पर्यंतच होते. जसे हे हक्क संपतील तसेच मनीष शाह त्यांच्या चॅनेलवर हा सिनेमा चालवणार आहे.

तत्पूर्वी २३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशम’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. त्यांच्यासोबतच या सिनेमात सौंदर्या, जयसुधा, अनुपम खेर, कादर खान, शिवाजी साटम, बिंदू, मुकेश आदी दमदार कलाकार होते. रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या दोन्ही पत्नींना त्यांचा आवाज दिला होता. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या या सिनेमाने टीव्हीवर मात्र अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा