Monday, July 1, 2024

“जरा सेटपर्यंत सोडतो का?” अमिताभ बच्चन यांनी चक्क रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट

अमिताभ बच्चन आज जरी त्यांनी त्यांची ७५ वी पार केली असली तरी त्यांचे कामाबद्दल असणारे प्रेम, ओढ आणि उत्साह आजच्या तरुणाईला देखील लाजवणारा आहे. सोशल मीडियावरही ते कमालीचे सक्रिय आहे. अमिताभ बच्चन यांना अगदी सुरुवातीपासूनच कुठेही वेळेवर पोहचण्याची सवय आहे. त्यांना दिलेली वेळ पाळण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखले जाते. शूटिंगसाठी देखील ते वेळेवरच पोहचत असतात. त्यांचे याबद्दलचे अनेक किस्से इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये प्रसिद्ध आहेत. अशातच आता नुकतेच असे काही घडेल ज्यामुळे सध्या अमिताभ बच्चन यांचीच चर्चा आहे.

नुकतीच अमिताभ बच्चन यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ते एका बाइकवर बसलेले दिसत आहे. तर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अमिताभ बच्चन यांना शूटिंगच्या ठिकाणी पोहचण्यासाठी वेळ लागत होता. अशातच त्यांनी त्यांच्या फॅन्सला विनंती केली त्यांना सोडण्याची आणि ते त्याच्या बाइकबरून सेटवर पोहचले आहे. याचसोबत एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “राइडसाठी धन्यवाद मित्रा. मी तुला ओळखत नाही, मात्र तू मला माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर सोडले. जोरात आणि न संपणाऱ्या ट्राफिक जॅम पासून वाचवण्यासाठी धन्यवाद. कॅप, शॉर्ट्स आणि पिवळ्या रंगाच्या टीशर्टचा मालक.” अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या या लिफ्टबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. सोबतच काहींनी तर त्यांना “मी तुम्हाला सोडायला रोज येत जाईन,” असे म्हटले तर काहींनी, “तुम्ही दोघांनीही हेल्मेट न घालता हा प्रवास केला…” असे लिहिले आहे.

अमिताभ बच्चन हे लवकरच त्याच्या चर्चित अशा ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार असून हा सिनेमा पुढीलवर्षी अर्थात १२ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव

केवळ बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडमध्ये देखील ‘या’ मराठी कलाकारांनी पाडलीये छाप

हे देखील वाचा