Sunday, December 3, 2023

90 कोटींचे कर्ज चुकवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी केले दोन शिफ्टमध्ये काम, इंडस्ट्रीमध्ये केले दमदार पुनरागमन

अमिताभ बच्चन बस नाम ही काफी है! बॉलिवूडमध्ये अनेक दशकं काम करणारे अमिताभ बच्चन हे प्रत्येक पिढीतील कलाकारासाठी किंबहुना सामान्य लोकांसाठी आदर्श आहे. आपल्या कामावर प्रेम करत समर्पक भावनेने ते काम करतात. त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज हे त्यांची वैशिष्ट्ये. आज अमिताभ बच्चन हे कोट्यवधी रुपये कमावतात आणि त्यांची अमाप मालमत्ता देखील आहे. आज त्यांच्यासोबत मनोरंजनविश्वातील सर्वच निर्माते, दिग्दर्शकांना काम कार्याचे आहे. मात्र असे असले तरी हाताची पाचही बोटं कधीच सारखी नसतात. त्यामुळे जरी आज अमिताभ बच्चन कोट्याधीश असले. तरी त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा अमिताभ यांच्यावर १/२ नाही तर तब्बल ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांना त्यांच्या व्यवसायात मोठा तोटा झाला आणि ते कर्जबाजारी झाले. तेव्हा त्यांच्या हातात काम देखील नव्हते.

अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करायचे होते. मात्र त्यांना अपेक्षित काम देखील होत नव्हते. तेव्हा त्यांच्या हातात दिग्दर्शक सुनील दर्शन यांचा ‘एक रिश्ता: द बांड ऑफ लव’ हा सिनेमा होता. त्यानंतर त्यांनी यश चोप्रा यांनी देखील काम देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना ‘मोहब्बते’ सिनेमा मिळाला. पुढे करण जोहरचा ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमात त्यांची वर्णी लागली. या तिन्ही चित्रपटांची शूटिंग एकसाथ चालू होती. त्यातच एकदा ‘एक रिश्ता: द बांड ऑफ लव’ सिनेमाची शूटिंग चालू असताना अचानक सर्वाना समजले की, जुही चावला प्रेग्नेंट आहे. ही गोष्ट जेव्हा सुनील यांनी अमिताभ यांना सांगितली तेव्हा ते म्हणाले की ‘तुम्ही काम चालू करा, मी इथेच आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

पुढे सुनील यांनी सांगितले की, “अमिताभ बच्चन हे त्यांच्या कामाप्रती खूपच प्रामाणिक आणि काटेकोर आहेत. त्याकाळी त्यांचे वय ५८ वर्षांचे होते. त्यावेळी ते सकाळी ९ वाजेपासून ते संध्याकाळी ६ पर्यंत ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमाची शूटिंग करायचे तर रात्री ७ नंतर पहाटे २ पर्यंत ते माझ्यासोबत काम करायचे.

तत्पूर्वी अमिताभ बच्चन यांची ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ (ABCL) ही प्रोडक्शन कंपनी होती. मात्र १९९९ साली त्यांच्या कंपनीमुळे त्यांना खूपच मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी रात्रंदिवस एक करून काम केले आणि त्यांच्या डोक्यावरचे संपूर्ण कर्ज चुकवत इंडस्ट्रीमध्ये दमदार रीएन्ट्री घेतली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम…’, म्हणत हेमंत ढोमेने केली ‘वाळवी’ सिनेमावर पोस्ट
शाहरुख खानचा ‘पठाण’ गाठणावर उंची, दिसणार जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर

हे देखील वाचा