Friday, July 5, 2024

कलाकारांनी दिल्या अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, घराबाहेर येऊन बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोमवारी (११ ऑक्टोबर) आपला ७९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून शुभेच्छा येत आहेत. अमिताभ बच्चन यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकजण त्यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक झाला होता. अनेक चाहते त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर येऊन त्यांना शुभेच्छा देत होते. अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या चाहत्यांना निराश न करता ‘जलसा’ बाहेर येऊन सर्वांचे आभार मानले. अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे आयकॉन असून, तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच पिढीतील लोकं त्यांचे चाहते आहेत.

बिग बींनी वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःचा एक न फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वयाचाही उल्लेखही केला आहे. पण बिग बींनी पोस्टमध्ये चुकून आपला वाढदिवस ८० वा असल्याचे लिहिले आहे. यावर बिग बींची मुलगी श्वेता नंदाने लिहिले की, “हा तुमचा ७९ वा वाढदिवस आहे.”

बिग बींचा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या रायही त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसहून मुंबईला परतले आहेत. सोमवारी सकाळी ते विमानतळावर दिसले. एवढेच नाही, तर बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजय देवगण, रणवीर सिंग, भूमी पेडणेकर, कोरियोग्राफर फराह खान यांच्यासह अनेक कलाकारांनी बिग बींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याबाहेर रात्री उशिरापासूनच चाहत्यांचा जमाव होण्यास सुरुवात झाली होती. बंगल्याबाहेर त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक देखील कापला आहे. बिग बींनी देखील चाहत्यांचे आभार मानले आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांचा ब्लॉग चाहत्यांसोबत शेअर केला आणि ‘पान मसाला कमला’च्या जाहिरातीचा करार त्यांनी संपुष्टात आणल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे याची घोषणा केली आहे. तसेच जाहिरातीसाठी मिळालेले शुल्कही परत केल्याचे सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा