Thursday, August 7, 2025
Home अन्य ‘प्रत्येकवेळी नाही म्हणतो पण…’ ७९ वर्षीय अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाबद्दल बोलताना झाले भावूक

‘प्रत्येकवेळी नाही म्हणतो पण…’ ७९ वर्षीय अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाबद्दल बोलताना झाले भावूक

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. ते लवकरच ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या क्विझ शोच्या सीझन १४ ला उपस्थित राहणार आहे. ‘केबीसी’ (KBC) प्रेक्षकांचे मनोरंजन करते आणि ज्ञानही वाढवते. यावेळी पुन्हा अमिताभ बच्चन शो होस्ट करताना दिसणार आहेत. त्यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लिहून ही माहिती दिली आहे. ७९ वर्षांचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या सेटवरून त्यांच्या शूटिंगचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, “प्रत्येक वेळी कामावर परतताना शंका आणि दुविधा असतात. पण प्रत्येक सीझन सारखाच वाटतो. कॅमेरे आणि प्रेक्षकांना तोंड देताना ते इतरांना वेगळं वाटत असलं तरी वाद-विवाद होतात, सर्व काही कामाचाच भाग आहे. माझ्यासाठी वास्तविक गोष्टी महत्त्वाच्या आहेत.”

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये पुढे लिहिले की, त्यांना केबीसीचे आयोजन करायचे नाही. प्रत्येक वेळी जेव्हा ते या शोला नाही म्हणतात, तेव्हा शोसाठीची त्यांची बांधिलकी त्यांना हो म्हणायला भाग पाडते. ते वेळोवेळी विचार करतात पण तरीही तो एक भाग बनतोच. शोबद्दलची बांधिलकी लक्षात ठेवून ते शोचा एक भाग बनतात. त्यांनी लिहिले, “प्रत्येक वेळी मी ‘पुन्हा कधीच नाही’ असे म्हणतो आणि तरीही जेव्हा ते वचनबद्धतेच्या बाबतीत येते तेव्हा हे सर्व परत येते.. म्हणून अनुसरण करा आणि स्वीकार करा आणि सर्वोत्तम प्रयत्नांसह पुढे जा…आणि म्हणूनच मी प्रयत्न करत आहे.”

त्याच वेळी, नवीन सीझनचा प्रोमो देखील निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज केला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन खेळात नवीन पैशांची घोषणा करताना दिसत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४व्या सीझनमध्ये अनेक नवीन नियमांचा समावेश होणार आहे. एवढेच नाही तर शोची बक्षीस रक्कम सात कोटींवरून साडेसात कोटी रुपये करण्यात आली आहे.

यंदा देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना केबीसीमध्ये नवीन नियम जोडण्यात आला आहे. हा नियम ७५ लाख रुपयांचा आहे. यामध्ये चुकीचे उत्तर आल्यास स्पर्धकाला ७ कोटींऐवजी ७५लाखांची रक्कम मिळेल. या शोचा पहिला सीझन २००० मध्ये प्रसारित झाला होता. तेव्हापासून हा शो देशातील लोकांना आणि प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्याचे यजमान बदलत गेले. त्यानंतरही केबीसी शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची पसंती राहिला आहे.

हे देखील वाचा