Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड चित्रपटांचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन कमाईत आहे सर्वांचे ‘बापमाणूस’

चित्रपटांचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन कमाईत आहे सर्वांचे ‘बापमाणूस’

अमिताभ बच्चन. बस नाम ही काफी है! अमिताभ बच्चन नाव उच्चारल्या उच्चारल्या बोलण्यात अदब, नजरेत आदर आणि देहबोलीत नम्रपणा आपसूकच येतो. महानायक, बिग बी आदी अनेक नावानी ओळखले जाणारे अमिताभ बच्चन आज त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी पडद्यावर सशक्तपणे अभिनय करत प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणले. आजही अमिताभ बच्चन हे चित्रपटांचे अनभिषिक्त सम्राट म्हणूनच ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्वाने सर्व प्रेक्षकांना भारावून सोडले आहे. 1942 साली जन्म झालेले अमिताभ आज 80 च्या उंबरठयावर असूनही तितक्याच जोशात काम करताना दिसतात. त्यांचा फिटनेस, त्यांची शिस्त आजच्या पिढीसाठी आदर्श आहे. ‘भुवन शोम’ या सिनेमात आवाजाच्या माध्यमातून त्यांनी या ग्लॅमर जगात प्रवेश केला. ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमापासून सुरू झालेला त्यांचा अभिनय प्रवास आजही अविरत चालू आहे.

आनंद, जंजीर, अभिमान, सौदागर, चुपके चुपके, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर एंथनी, त्रिशूल, डॉन, मुकद्दर का सिकंदर, मि. नटवरलाल, लावारिस, सिलसिला, कालिया, सत्ते पे सत्ता, नमक हलाल, शक्ति, कुली, शराबी, मर्द, शहंशाह, अग्निपथ, खुदा गवाह, मोहब्बतें, बागबान, ब्लॅक, वक्त, सरकार, चीनी कम, भूतनाथ, पा, सत्याग्रह, चेहरे, आरक्षण आदी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी देखील गायली. एकेकाळी आपल्या आवाजामुळे त्यांनी नोकरी गमावली, पण आज हाच आवाज त्यांची ओळख आहे.

तसे पाहिले तर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सर्वांना माहित आहे. मात्र आज आम्ही या लेखातून अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. गेली अनेक दशकं अभिनयात सक्रिय असणाऱ्या अमिताभ यांनी सर्वच क्षेत्रांमध्ये नशीब आजमावले. अभिनयाचे विद्यापीठ असण्यासोबतच त्यांनी राजकारणामध्ये देखील प्रवेश केला होता. मात्र त्यांचे मनं तिथे रमले नाही आणि ते पुन्हा अभिनयात सक्रिय झाले. त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील चालू केले होते, मात्र फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांचा प्रोडक्शन हाऊसला तोटा झाला आणि ते बंद झाले. आज अमितभ अभिनय, गायन, सूत्रसंचालन सर्वच गोष्टींमध्ये अव्वल आहे. एवढे वर्ष या ग्लॅमर जगात काम करणाऱ्या अमिताभ यांनी नेम, फेम, मनी सर्वच गोष्टी प्रचंड प्रमाणात कामवाल्या. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल तुम्हाला समजल्यावर डोळे नक्कीच पांढरे होतील.

एका रिपोर्टनुसार अमिताभ यांची एकूण संपत्ती २,९५० कोटी इतकी आहे. अमिताभ यांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. तर महिन्याभराची त्यांची कमाई पाच कोटी रुपयांहून अधिक आहे. अभिनयाचे बापमाणूस असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक आलिशान आणि मोठ्या गाड्या आहेत. त्यांच्याकडे एकूण ११ गाड्या असून, त्यात बीएमडब्ल्यू, लेक्सस, रोल्स रॉयस आणि मर्सिडीज अशा आलिशान गाड्यांचा समावेश आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधला सर्वात महत्वाचा टप्पा ठरला. त्यांच्या पडत्या काळाता या शोने त्यांना मोलाची साथ दिली. या शोसाठी अमिताभ बक्कळ मानधन घेतात. चित्रपट, सूत्रसंचालन, जाहिरात आदी माध्यमातून अमिताभ तुफान कमाई करतात.

आपल्या कारकिर्दीत २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अमिताभ यांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांना देश विदेशातील अनेक सन्मान मिळाले आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कारापासून ते पद्मश्री, पद्मभूषण हे भारताचे सर्वोच्च नागरी सन्मानही त्यांना मिळाले आहेत. शिवाय त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि सोळा वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना २०१५ मध्ये फ्रान्स सरकारने ‘नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. फ्रेंच डायरेक्टर फ्रांस्वा ट्रुफोटा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना ‘वन मॅन इंडस्ट्री’ हा किताब दिला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा