बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व गोष्टींची माहिती देत असतात. अमिताभ बच्चन कितीही उशीर झाला तरी त्यांचे सोशल मीडिया अपडेट करतात. प्रत्येक विशेष दिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून ते जुन्या आठवणी शेअर करण्यापर्यंत सर्वच गोष्टी ते फॅन्ससोबत शेअर करतात. अमिताभ बच्चन त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येतात. मात्र याच सोशल मीडिया पोस्ट त्यांना अनेकदा गोत्यात देखील आणतात. सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांना अनेकदा माफी देखील मागावी लागली आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा देताना बिग बींकडून पुन्हा चूक झाली आहे. यावेळी झालेली ही चूक जरा जास्तच मोठी म्हणावी लागेल.
बिग बींनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना एक चूक केली आणि ती चूक त्यांच्या एका चाहत्याच्या लक्षात देखील आली. त्याने लगेचच बिग बींना कमेंट करत त्यांची चूक काय आहे ते सांगत लिहिले की, “‘खुदा गवाह’ सिनेमातील एका सीनमध्ये तुम्ही ‘पेशेवर मुजरिम’ ऐवजी ‘पेशावर मुजरिम’ असे म्हणाला होतात. तुम्ही एका महान कवीचे पुत्र आहात. दशाननचा पराभव झाल्यामुळे ‘दशहरा’ बनला ‘दशहेरा’ नाही. जाहिरातबाजी करायचे सोडून जरा शुद्धलेखनावर लक्ष द्या.”
विशेष म्हणजे बिग बींनी देखील त्यांची चूक लगेच मान्य केली, आणि लगेचचं झालेल्या चुकीची माफीसुद्धा मागितली. त्यांनी माफी मागत लिहिले की, “जे काही झाले त्याबद्दल मी माफी मागतो. ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.”
अमिताभ बच्चन यांनी केलेली ही चूक राजेश कुमार नावाच्या व्यक्तीने लक्षात आणून दिली. चूक माणसाकडूनच होते आणि ती चूक सुधारणे देखील त्याच माणसाचे काम असते. बिग बींनी याआधी देखील चाहत्यांच्या अशा पद्धतीच्या कमेंटला उत्तर दिलेले आहे. बिग बींनी आता दिलेल्या उत्तराला जवजवळ ४ हजार लोकांनी लाईक केले आहे.
अमिताभ बच्चन सध्या ७९ वर्षांचे आहेत. त्यांच्या वयाचे फक्त तेच आजही सिनेसृष्टीमध्ये सक्रिय आहेत. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. तसेच लवकरच नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटामधून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या या चित्रपटाची देखील उत्सुकता लागलेली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर
–आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स