Monday, October 13, 2025
Home टेलिव्हिजन अमिताभ आणि सलमानची हाेस्टिंगवर जुगलबंदी! काेण भारी?

अमिताभ आणि सलमानची हाेस्टिंगवर जुगलबंदी! काेण भारी?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सलमान खान (Salman Khan) दोघंही मस्तपैकी टीव्ही शोज होस्ट करतात. पण प्रश्न असा आहे दोघांपैकी टीव्हीवरून जास्त पैसे कोण कमावतो?चला,आता आपण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया!

बॉलिवूडचे मोठे स्टार्स फक्त चित्रपटातचं नाही,तर टीव्हीवरसुद्धा तितकेच चमकतात! ते त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकतात आणि टीव्हीवर रिअ‍ॅलिटी शो होस्ट करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्षं ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करतायत.प्रेक्षकांना त्यांच्या आवाजाशिवाय शो अधुरा वाटतो! आणि दुसरीकडे सलमान खान ‘बिग बॉस’ होस्ट करतोय. ‘वीकेंड का वार’ मध्ये तो कंटेस्टंटची जशी वाट लावतो, ते बघायला लोक वेडे होतात!

अमिताभ आणि सलमान दोघंही हे शो होस्ट करून जबरदस्त कमाई करतात! ‘कौन बनेगा करोड़पति’ चा 17वा सीझन सुरू होतोय! काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की यावेळी अमिताभ बच्चन शो होस्ट करणार नाहीत.पण मग त्यांनी एक प्रोमो शेअर करून सांगितलं “मीच येतोय पुन्हा!” टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,बिग बी एका एपिसोडसाठी तब्बल ५ कोटी रुपये घेतात! आणि आठवड्यात ५ एपिसोड्स असल्यानं ते दर आठवड्याला २५ कोटी कमावतात!म्हणूनच ते आजही टीव्हीवर सगळ्यात जास्त पैसे घेणारे होस्ट आहेत!

सलमान खानला ‘बिग बॉस’ होस्ट करत बऱ्याच वर्षांपासून बघतोय,नाही का? आता तर असं झालंय की, तो ‘वीकेंड का वार’ मध्ये दिसला नाही,तर लोक म्हणतात “अरे, मजाच आली नाही एपिसोडला!” सलमान रागावतोही धमाल करतो आणि तेच बघायला सगळे उत्सुक असतात! स्क्रीनच्या रिपोर्टनुसार,सलमानला एका एपिसोडसाठी ८ ते १० कोटी रुपये मिळतात! आठवड्यात त्याचा शो फक्त दोनदाच येतो,म्हणून त्याची वीकली कमाई थेट १६ ते २० कोटी रुपये होते! बिग बॉस १९ लवकरच सुरू होतोय! सलमान खाननं नुकताच या शोचा प्रोमो टाकला आहे,आणि त्यात तो एकदम नव्या अंदाजात दिसतोय!

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा  

दिग्दर्शक अ‍ॅटलीने पत्नीसोबतचे केले फोटो शेअर, युजर्सनी केल्या अशा कमेंट

हे देखील वाचा