Thursday, July 18, 2024

आम्रपाली दुबे आणि निरहुआचे केले लग्न? अभिनेत्याने स्वत: शेअर केला फोटो

अभिनेत्री दिनेश लाल यादव निरहुआ (Dinesh lal yadav) आणि आम्रपाली दुबे (Amrapali Dubey) हे भोजपुरी चित्रपट जगतातील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याला कारण म्हणजे त्यांचे लग्नाच्या पेहरावातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे दोन्ही स्टार्स सध्या नेपाळमध्ये आगामी ‘निरहुआ बनाल करोडपती’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. या सेटवरून दोघांनीही त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो आणि नेपाळी स्टाईलमधील चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सध्या त्यांचे हे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काय आहे या व्हायरल बातमीचे सत्य चला जाणून घेऊ.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, दिनेश लाल यादव निरहुआने आम्रपालीसोबतच्या लग्नाचा नेपाळी गेटअपमधील फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन  शेअर केला आहे. यामध्ये त्यांची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्टपणे पाहायला मिळते. या व्हायरल फोटोंमध्ये अभिनेता निरहुआ डोक्यावर नेपाळी टोपी घालून वराच्या पेहरावात दिसत आहे. त्याने वराचा शानदार पोशाख केला आहे. त्यामुळे तो हुबेहुब नेपाळी व्यक्ती वाटत आहे. त्याची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे. त्याचवेळी अभिनेत्रीच्या वेशात असलेली आम्रपालीही खूपच मनमोहक दिसत आहे. तिने नेपाळी  नववधूचा गेटअप केला आहे. वधू-वरांच्या जोडीमध्ये या दोन्ही कलाकारांची जोडी खूपच छान दिसत आहे. या व्हायरल फोटोवर त्यांच्या चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

त्यांच्या या व्हायरल फोटोवर अनेक चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये काही चाहत्यांनी खरेच लग्न झाले आहे का असा प्रश्न विचारला आहे तर काही चाहत्यांनी “तुमची जोडी खूपच छान दिसत आहे” असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या या व्हायरल फोटोवर अभिनेता प्रदिप पांडेने “अभिनंदन” अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आणखीनच गोंधळात पडले आहेत. दरम्यान अभिनेत्री आम्रपाली आणि निरहुआ लवकरच ‘राजा डोली लेके आजा’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री श्रुती रावही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा