लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस 16 चा ग्रॅंडफिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे ट्रॉफी जिंकण्यासाठी घरामध्ये स्पर्धकांची चढाओढ सुरु आहे. यंदाचं बिग बॉस 16 पर्व महाराष्ट्राच्या शिव ठाकरेने गजवला आहे. घरामध्ये तो कोणचातरी मोठा भाऊ, एक चांगला मित्र, आणि घरामधील वावरण्याची पद्धत अशा अनेक गुणांमुळे शिवने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच वाटतंय की, शिव ठाकरेच विजेता ठरणार आहे. अशातच भाजप नेत्या आणि अभिनेत्री नवनीत राणा यांनी देखिल शिव ठाकरेला पाठिबा दिला आहे.
अमरातवतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या राजकारणापूर्वी साउथमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दामदार अभिनयाची छाप सोडली आहे. मात्र, आता त्या राकारणामध्ये जास्त सक्रिय आहेत. नुकतंच त्यांनी मराठमोळ्या शिव ठाकरे (Shiv Thakare)ला पाठिंबा देत ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो तुफान व्हायरल झाला आहे.
नवनीत राणा या व्हायरल झालेल्या व्हिडिओमदध्ये म्हणाल्या की, “नमस्कार कलर्स वाहिनीवरील बिग बॉस हिंदीच्या 16 व्या पर्वात आपल्या अमरावतीची शान शिव ठाकरे सहभागी झाला आहे. शिव पहिल्याच दिवसापासून शेवटपर्यंत फार प्रामाणिकपणे त्याचा खेळ खेळत आहे. त्यामुळे मी एक लोकप्रतिनिधी आणि अमरावतीची नागरिक असल्याच्या नात्याने मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की, यंदा एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिव ठाकरेला आपण पाठिंबा देऊ या. त्याबरोबरच त्याला भरघोस मत देऊन बिग बॉसचा विजेता ठरवू या.”
Vote for Shiv Thakare pic.twitter.com/2cj3mluUzo
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) February 5, 2023
नवनीत राणा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायर होत असून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव करत शिव ठाकरेच विजेता ठरणार असे मत व्यक्त केलं आहे. त्याशिवया शिवने शिव ठाकरे ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यामुळे जनतेप्रती शिवची क्रेज पाहायला मिळत आहे. शिवचा वाढता चाहतावर्ग पाहून असं दिसून येत आहे की, तो लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करु शकतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसाद ओकच्या ‘त्या’ व्हिडिओवर बायको मंजिरीची कमेंट ठरली लक्षवेधी
इस्लामसाठी अभिनय क्षेत्र सोडणारी ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री देणार गुडन्युज? फोटो शेअर करत म्हणाली…