Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड गोंडस ‘वीर’चा फोटो आला समोर; अमृता रावच्या बाळाची पहिली झलक व्हायरल!

गोंडस ‘वीर’चा फोटो आला समोर; अमृता रावच्या बाळाची पहिली झलक व्हायरल!

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव ही सध्या तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. 2020 साली अमृता आणि आरजे अनमोल पालक बनले होते. 1 नोव्हेंबरला अमृताने वीर या गोंडस मुलाला जन्म दिला होता. आत्तापर्यंत या जोडप्याने वीरचा चेहरा मीडियापासून लपवून ठेवला होता. अशामध्ये आता, अनमोलने ट्विटरवर आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांचे छोटेसे कुटुंब एका फ्रेममध्ये दिसत आहे, ज्यावर चाहते प्रेम व्यक्त करत आहेत.

अमृताचा पती आरजे अनमोलने, मुलाच्या जन्माच्या 4 महिन्यानंतर पहिल्यांदाच त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत वीर खूपच गोंडस दिसत आहे. हा त्याचा पहिला फोटो आहे, ज्यामध्ये त्याचा चेहरा पूर्णपणे पाहिला जाऊ शकतो. फोटो शेअर करत अनमोलने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमचे जग, आमचा आनंद, वीर.’ आता चाहते या फोटोला भरभरून प्रेम देत आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

यापूर्वीही अमृताने मुलगा वीरचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. तथापि, त्या फोटोत फक्त वीरचा हात दिसत होता. फोटो शेअर करत तिने लिहिले, ‘हॅलो वर्ल्ड, भेटा आमचा मुलगा वीरला. तुम्हा लोकांचे आशीर्वाद हवे आहेत.’ या फोटोत अमृता, अनमोल आणि त्यांच्या मुलाचा हात दिसला होता.

आरजे अनमोल आणि अमृता राव हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघेही त्यांचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अमृता आई झाल्यापासून ती मुलाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती म्हणाली होती की, “आई होण्याची भावना ही या जगातील सर्वात सुंदर भावना आहे.”

एका मुलाखतीत अमृता म्हणाली होती की, जर तिला वाटले तर ती तिच्या मुलाची काळजी घेण्यासाठी स्टाफची लाईन लावू शकते. परंतु तिने त्याच्यासाठी एक आया देखील नाही ठेवली. अमृता म्हणाली, “मी असा विचार केला नव्हता की, मी अशी आई बनेल जी संपूर्ण काळ कार्यरत असेल. मला हवे असते तर मी माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी लोकांना रांगेत उभे केले असते, परंतु मी आया देखील ठेवली नाही.” अमृताने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. लग्नानंतर तिने चित्रपटातून ब्रेक घेतला. काही दिवसांपूर्वी तिने ‘ठाकरे’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’

-लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मृती इराणींनी हटके अंदाजात दिल्या पतीला शुभेच्छा

-दुःखद!! अभिनेता हेनरी डॅरो यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन

हे देखील वाचा