Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रेमात ३ वेळा अपयशी, १२ वर्षांनी लहान असणाऱ्या सैफ अली खानसोबत अमृताने केले होते लग्न, आता सिंगल मदर बनून जगतेय आनंदी आयुष्य

बॉलिवूड अभिनेत्री ‘अमृता सिंग’ ही चित्रपटांपेक्षा तिचे लग्न आणि घटस्फोट यामुळेच खूप चर्चेत राहिली आहे. अमृताने बॉलिवूडमधील बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. एकेकाळी तर ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. अमृताने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु स्वतःपेक्षा 12 वर्षांनी लहान असणाऱ्या सैफ अली खान सोबत लग्न केल्याने ती चर्चेत आली. अमृता आणि सैफ अली खान यांनी लग्नाच्या 13 वर्षानंतर घटस्फोट घेतला. आज एकीकडे सैफ करिना सोबत आनंदात आहे, तर दुसरीकडे अमृता ही आपल्या 2 मुलांसोबत आनंदात राहते. सैफनंतरही, तिच्या आयुष्यात ती 3 वेळा प्रेमात पडली होती. परंतु ते प्रेम पूर्ण झाले नाही.

अमृता सिंगने 1983 साली ‘बेताब’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. यामध्ये सनी देओल हा मुख्य भूमिकेत होता. खरं पाहायचं झालं, तर या चित्रपटात धर्मेंद्र यांनीच अमृताला आपल्या मुलाची नायिका म्हणून घेतले होते. हा चित्रपट पडद्यावर जबरदस्त हिट झाला होता. तसेच अमृता आणि सनीची जोडी देखील चाहत्यांना खूपच आवडली होती.

त्यानंतर 1984 मध्ये अमृता आणि सनीला पुन्हा एकदा ‘सनी ‘या चित्रपटासाठी निवडण्यात आले होते. या चित्रपटात ‘शर्मिला टागोर’ सुध्दा महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. त्यावेळी अमृतालाही माहित नव्हते की, पुढे जाऊन अमृता त्यांची सासू बनणार आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार त्याकाळात सोबत काम करत असल्याने अमृता आणि सनी एकमेकांच्या खूप जवळ आले होते. तसे त्यांचे नाते कधी लोकांसमोर उघड नाही झाले. परंतु दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

असं म्हटलं जातंय की, सनी व्यतिरिकतही रवी शास्त्री आणि विनोद खन्ना अमृताच्या खूप जवळ आले होते. एकेकाळी अमृताला विनोद खन्ना देखील खूप आवडत होते. परंतु ते प्रेम देखील अपूर्ण राहिले. यातच अमृताच्या आयुष्यात सैफ अली खान आला. आणि ते एकमेकांच्या प्रेमात पूर्णतः बुडाले होते. 1991 मध्ये जेव्हा अमृता आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होती, तेव्हाच तिने स्वत: पेक्षा 12 वर्षांनी लहान असणाऱ्या सैफ अली खानसोबत लग्न केले.

अमृता सिंग ही सैफपेक्षा वयाने मोठी होती. त्यामुळे त्यावेळी मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. सैफ आणि अमृता यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा काहीही फरक पडला नव्हता.

सैफ आणि अमृता यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले झाली. परंतु जेव्हा सैफ आणि अमृता यांच्यात वाद होऊ लागले, तेव्हा 13 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आणि एकमेकांपासून वेगळे झाले. आता अमृता आपल्या 2 मुलांसोबत अपार्टमेंटमध्ये राहते, तर सैफ आपली दुसरी पत्नी करिना कपूर खान हिच्यासोबत पतौडी पॅलेसमध्ये राहतो. त्यांची मुले सारा आणि इब्राहिम यांनी त्यांची आई अमृता तसेच वडील सैफ यांच्यासोबतही चांगले संबंध प्रस्थापित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काय होतोय सैफ चा मुलगा इब्राहिम अली खानचा हा फोटो व्हायरल?

राम कदमांचे तांडव! सैफच्या बहुचर्चित सिरीजमधील ‘त्या’ दृष्यावरुन राम कदमांची पोलीसांत तक्रार

साराला अली खान देखील झाली रिप्लेस, ड्रग्स प्रकरणात नाव आल्याने सारा ऐवजी ‘या’ अभिनेत्रीला सिनेमात मिळाली एन्ट्री

हे देखील वाचा