Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त अमृता फडणवीस यांनी खास पोस्ट शेअर करत, चाहत्यांना दिली अनोखी भेट

मागील बऱ्याच काळापासून माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असलेल्या देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणीस (Amruta Fadnavis) त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे सतत प्रकाशझोतात असतात. अमृता यांची ओळख एक गायिका म्हणून देखील आहे. अमृता यांची आतापर्यंत काही गाणी प्रदर्शित झाली असून, ते गाणे हिट देखील झाले आहेत. आता पुन्हा एकदा अमृता चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने केलेली पोस्ट. अमृता फडणीस यांनी १४ फेब्रुवारीला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. अमृता यांनी त्यांच्या आगामी गाण्याची घोषणा व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी करत चाहत्यांना एक छान सरप्राईज दिले आहे.

अमृता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये त्यांचा एक क्रोमा बॅकग्राऊण्डवरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांचा लूक खूपच वेगळा दिसत असून, साध्वीची वेशभूषा आणि हातात त्रिशूल अशा वेगळ्या अवतारात त्या दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले की, “मी आता आणि यापुढे कायमच तुला निवडले आहे. तू माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात आहेत. ज्या दिवशी आपल्या प्रिय लोकांबद्दल प्रेम व्यक्त करायचे असते त्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त मी माझ्याकडून संगीतमय कौतुक करणार आहे माझ्या रुद्रचे”. या पोस्टमध्ये त्यांनी लॉर्ड शिवा अर्थात भगवान शंकर हा हॅशटॅगही वापरला आहे. फोटोवरुन आणि कॅप्शनवरुन हे गाणे नक्कीच भगवान शंकरावर असल्याचे समजत आहे. लवकरच महाशिवरात्र देखील येत असल्याने कदाचित हे गाणे त्या दिवसाच्या निमित्ताने तयार केल्याचे देखील बोलले जात आहे.

अमृता फडणीस यांनी मागच्या वर्षी २०२१ च्या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने त्यांचे ‘ये नयन डरे डरे’ हे गाणे प्रदर्शित केले होते. अमृता यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे गाणेही खूपच गाजले. अमृता फडणीस या त्यांच्या गाण्यांसोबतच त्यांच्या वक्तव्यांसाठी देखील तुफान गाजतात. त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जाते. मात्र त्याकडे त्या सर्रास दुर्लक्ष करतात. राज्यातील विविध विषयांवर अमृता फडणवीस आपलं रोखठोक मत व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईतील रस्त्यांबद्दल एक विधान केले होते की, “रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात.” यावरून देखील त्यांना राजकीय आणि सोशल मीडिया क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले.

हेही वाचा –

हेही पाहा- 

हे देखील वाचा