Tuesday, August 5, 2025
Home मराठी आशा भोसले यांनी अमृता फडणवीस यांना गाण्याबद्दल दिला मोलाचा सल्ला म्हणाल्या, ‘तू अधिक सराव…’

आशा भोसले यांनी अमृता फडणवीस यांना गाण्याबद्दल दिला मोलाचा सल्ला म्हणाल्या, ‘तू अधिक सराव…’

आशा भोसले बस नाम ही काफी है! मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय गायिका आहेत. त्यांनी त्यांच्या आवाजाने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि आजही करत आहे. आशा भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती भाषांमध्ये, किती गाणी गायली हे आता महत्वाचे राहिलेले नाही. त्यांचे कर्तृत्व यापेक्षा खूप जास्त मोठे आहे. आशा भोसले यांना आतापर्यंत अनेक लहानमोठे पुरस्कार मिळाले आहेत. यातच आता त्यांना मानाचा अजून एक पुरस्कार मिळाला आणि तो म्हणजे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचा देखील समावेश होता. या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी आशा भोसले यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आशाताई आणि अमृता फडणवीस यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

या गप्पांमध्ये आशाताई यांनी अमृता यांना एक मोलाचा सल्ला देखील दिला. याबद्दल स्वतः अमृता फडणवीस यांनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितले आहे. त्यांनी आशा ताईंसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, “मी नुकतेच आशा भोसले यांना भेटले आणि राज्याचा सर्वोच्च पुरस्कार असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर संगीताबाबत संवादही साधला. यावेळी त्यांनी मला अनेक सल्ले दिली. खूप सराव आणि व्हॉईस मॉड्युलेशनबद्दल त्यांनी अनेक गोष्टी मला सांगितल्या. कसा सराव करायचा हे देखील त्यांनी मला सांगितले. आता पुढील म्युझिक सेशनसाठी खूप उत्सुक आहोत.”

दरम्यान आशा भोसले यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे राज्याचा सर्वोच्च असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०२१ या सालासाठी आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

हृदयविकारामुळे मनोरंजन विश्वाने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही व्हाल भावूक

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

हे देखील वाचा