गायिका अमृता फडणवीस सध्या संगीत क्षेत्रात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. आपले बँकिंग करियर सांभाळत त्या त्यांच्या गाण्याच्या आवडीला देखील वेळ देत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ही ओळख बाजूला सारत त्यांनी त्यांची एक गायिका म्हणून नवीन ओळख तयार केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘आज मैंने मूड बना लिया है’ या गाण्यातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांचे हे पहिले पंजाबी गाणे प्रदर्शित झाले आणि तुफान गाजले देखील. या गाण्यात अमृता यांचं कधीही न पाहिलेला एवढा हटके आणि ग्लॅमरस अंदाज सर्वांनी पहिला. आता त्यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. अमृता लवकरच एका नवीन गाण्यातून पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येणार आहे. अमृता यांचे आजवर आपण अनेक अल्बम्स पाहिले, मात्र त्या कोणत्या सिनेमात पार्श्वगायन करताना दिसल्या नव्हत्या मात्र आता अमृता लवकरच त्या एका सिनेमासाठी गाणे गाताना दिसणार आहे. खुद्द अमृता यांनीच ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली.
View this post on Instagram
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत सर्वांना एक सुखद धक्का दिला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा! लवकरच येणाऱ्या ‘भारतीयन्स’ या बहुभाषिक चित्रपटासाठी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गाणं गाणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. श्री सत्य कश्यप यांचे अगदी अंगावर शहारा आणणारे हे संगीत सर्वांनी नक्कीच ऐकायला पाहिजे.” या पोस्टसोबत त्यांनी त्यांच्या संपूर्ण गाण्याची लिंकसुद्धा शेअर केली आहे. सोबतच गाण्याचा एक छोटा ट्रेलर देखील रिलीज केला आहे. त्यांची ही पोस्ट चांगळूच गाजत असून, त्यावर अनेक कमेंट्स करत लोकं त्यांना शुभेच्छा देत आहेत.
अमृता फडणवीस यांचे ‘आज मै मूड बना लेया’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले होते. हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाले आणि रिलीज होताच गाण्याला 2.3 कोटी व्ह्यूज मिळाले होते. याआधी अमृता फडणवीस यांच्या ‘वो तेरे प्यार का गम’ या गाण्याला दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
‘भारतीयन्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दीन राज यांनी केले असून ते दक्षिणेतील प्रसिद्ध लेखक आहेत. या चित्रपटातून ते आता बॉलिवूडमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ‘भारतीयन्स’ची कथा भारतातील विविध प्रदेशांतील सहा तरुणांच्या एका ग्रुपभोवती फिरते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाद कार पण…! शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई
अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…