Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘वो तेरे प्यार का गम’, अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याची चाहत्यांना भुरळ, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिला व्हिडिओ

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) त्यांच्या दमदार गायिकीसाठी ओळखल्या जातात. आत्तापर्यंत अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी गायली आहेत ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी त्यांचे नवीन गाणे येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनाही या गाण्याची जोरदार उत्सुकता लागली होती. त्यांचे हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कोणते आहे ते अमृता फडणवीसांचे नवीन गाणे चला जाणून घेऊ. 

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावरुन त्या अनेकदा राज्याच्या राजकारणावर टिका टिप्पणी करताना दिसत असतात. स्पष्ट आणि बिंधास्त वक्तव्यासाठी त्या सर्वत्र प्रसिद्ध आहेतच. त्याचबरोबर अमृता फडणवीस त्यांच्या गायिकीसाठीही लोकप्रिय आहेत. त्यांचे प्रत्येक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले की त्याला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत असतो. सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांचा तसेच आवाजाचा मोठा चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटरवरुन नवीन गाणे येणार असल्याचे संकेत दिले होते.

पुर्वसूचना दिल्याप्रमाणे त्यांचे ‘वो तेरे प्यार का गम’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रदर्शित होताच त्यांच्या या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत तेरे प्यार का गम हे गाणे युट्यूबवर १५ लाख लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे सध्या त्यांचे हे गाणे चांगलेच व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. वो तेरे प्यार का गम या गाण्याची निर्मिती सारेगमप कडून करण्यात आली आहे. त्यांच्या या गाण्यावर प्रेक्षकांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडत जोरदार कौतुक केले आहे. दरम्यान अमृता यांनी गायलेले हे गाणे मुकेश यांनी गायले होते. तर आनंद बक्षी यांनी या गाण्याचे लेखन केले होते.

हे देखील वाचा