Friday, November 22, 2024
Home मराठी ‘शुद्ध सोनेच जणू!’, अमृता खानविलकरचे सोनेरी रंगाच्या ड्रेसमधील फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले कौतुक

‘शुद्ध सोनेच जणू!’, अमृता खानविलकरचे सोनेरी रंगाच्या ड्रेसमधील फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले कौतुक

मराठी मालिका, नाटक, चित्रपट, रियॅलिटी शो आणि हिंदी चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). अभिनयासोबतच तिच्या डान्स कौशल्याने तिने अवघ्या महाराष्ट्राला तिच्या प्रेमात पाडले आहे. तिच्या सौंदर्याने लाखो मुलांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर देखील तिचे लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत. तिच्या कामात व्यस्त असताना देखील ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन माहिती देत असते. अशातच तिचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

अमृताने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिने साईड कट असलेला सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिने सोनेरी रंगाचे हाय हिल्स घातले आहेत. या लूकमध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. तिचा हा लूक महाराष्ट्राचा फेवरेट कोण? सुवर्णदशक सोहळ्यातील आहे. तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Amruta Khanvilkar glamorous photo on social media)

तिच्या या लूकवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता सचिन कुंभार याने या फोटोवर “ग्लॅमरस” अशी कमेंट केली आहे. सई ताम्हणकरने “शुद्ध सोने” अशी कमेंट केली आहे. तसेच मृण्मयी देशपांडे आणि श्रेया बुगडे यांनी देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अमृताने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच वर्षी तिने ‘मुंबई सालसा’ या हिंदी चित्रपटात काम केले. तिने २००७ साली ‘साडे माडे तीन’, ‘हॅट्रिक’, ‘कॉन्टॅक्ट’, ‘फुंक’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘गैर’, ‘नटरंग’, ‘झक्कास’, ‘धूसर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘सतरंगी’, ‘शाळा’, ‘आयना का बायना’, ‘हिंमतवाला’, ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बस स्टॉप’, ‘वन वे तिकीट’, ‘मलंग’, ‘वेल डन बेबी’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

हेही नक्की वाचा –

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा