Tuesday, January 20, 2026
Home मराठी ‘सुंदर दिसण्याचं काही लिमिट?’ पिंक फ्लोरल ड्रेसमध्ये अमृताच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहत्याची भन्नाट प्रतिक्रिया

‘सुंदर दिसण्याचं काही लिमिट?’ पिंक फ्लोरल ड्रेसमध्ये अमृताच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहत्याची भन्नाट प्रतिक्रिया

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध नाव बनली आहे. आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री तिच्या फिटनेस आणि फॅशन स्टेटमेंटसाठी बरीच चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या सुंदरतेसाठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज देखील चाहत्यांना चांगलाच भावतो. नुकतेच तिने शेअर केले काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अमृताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटकरून काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा अतिशय सुंदर असा शॉर्ट फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. तुम्ही पाहू शकता की, यात तिने न्यूड मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत. या ग्लॅमरस लूकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक करून अभिनेत्री हॉट स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे. (amruta khanvilkar shared her glamorous photo in pink floral dress)

या फोटोमधील अमृताच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. म्हणूनच बघता बघता फोटोवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या फोटोवर ३७ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. एका चाहत्यांने कमेंट करत लिहिलंय की, “सुंदर दिसण्याचं काही लिमिट?” तर दुसरा म्हणतोय, “आज चंद्र लवकर उगवला वाटत!”

अमृताच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती येत्या काळात सचिन कुंडलकरच्या ‘पॉंडिचेरी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत वैभव तत्ववादी, महेश मांजरेकर आणि सई ताम्हणकर हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. तसेच अभिनेत्रीने ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटांतून बॉलिवूडमध्येही खास ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये तयार झाले गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडविणारे चित्रपट, एकावर तर पाकिस्तानने घातली होती बंदी

-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

-लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

हे देखील वाचा